BEAUTY TIPS : शेविंग करण्याअगोदर जाणून घ्या ‘या’ गोष्टी, नाहीतर होणार नुकसान !
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2017 07:53 AM2017-02-17T07:53:31+5:302017-02-17T13:25:00+5:30
सुंदर दिसण्यासाठी घाईने शेविंग करणे पुरेसे नाही. अशाने नुकसानही होऊ शकते, यामुळे शेविंग करतेवेळी नेहमी काही गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्यायला हवे.
Next
सुंदर दिसण्यासाठी घाईने शेविंग करणे पुरेसे नाही. अशाने नुकसानही होऊ शकते, यामुळे शेविंग करतेवेळी नेहमी काही गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्यायला हवे. मग कोणत्या आहेत त्या गोष्टी, चला जाणून घेऊया.
* शेविंग करण्याअगोदर चेहऱ्याला चांगल्याप्रकारे स्वच्छ पाण्याने धुवा. अशाने जरी त्वचेला ब्लेड लागले तरी इंफेक्शन होत नाही.
* दाढीला मुलायम बनविण्यासाठी फेसक्लोथला कोमट पाण्यात भिजवून ३० सेकंदापर्यंत दाढीवर लावून ठेवा. याने त्वचा व केस मुलायम बनतील.
* शेविंग क्रीम घेऊन चेहऱ्यावर आणि गळ्यावर अपवार्ड सर्कुलर मोशनमध्ये चांगल्याप्रकारे लावा. क्लोज आणि आरामदायक शेविंगसाठी नव्या रेजरचा वापर करावा.
* दाढीच्या वरील भागाच्या शेविंगसाठी दाढीच्या वरच्या भागापासून जॉ लाइनपर्यंत लांब स्ट्रॉक घ्या.
* गळ्यावरील शेविंग करण्यासाठी गळ्याच्या खालच्या भागापासून वरच्या बाजूने शेविंग करावे. याने रेजर बर्न आणि इनग्रोन हेअरची समस्या उद्भवत नाही.
* क्लोजर शेविंगसाठी आपण आपल्या हाताने त्वचेला मुलायम करु शकता.
* प्रत्येक स्ट्रोकनंतर रेजरला धुणे विसरु नका, नाहीतर केसांमुळे ते जाम होऊ शकते.
* मॉइस्चराइज शेविंगनंतर अल्कोहोलयुक्त आफ्टरशेवच्या ऐवजी अशा टोनरचा वापर करा, ज्यात विटॅमिन आणि ऐलोवेराचा अर्क असेल. शेविंग पूर्ण झाल्यानंतर मॉइस्चराइजर्सचा वापर करा.
Also Read : पिंपल्समुळे शेव्हिंग करणे झाले कठीण !