‘असाधारण’ कर्मचारी व्हायचयं? मग या ७ गोष्टी तुमच्यामध्ये हव्याच!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2016 04:40 PM2016-08-07T16:40:40+5:302016-08-07T22:20:39+5:30
मोठे यश मिळवायचे असेल तर यापेक्षा आणखी पुढे जाऊन एक ‘असाधारण’ कर्मचारी होण्याची तुम्हाला गरज आहे.
Next
आ च्या तीव्र स्पर्धेच्या युगात इतरांपेक्षा वेगळं आणि वरचढ होण्यासाठी सगळ्यांचीच धडपड चालू असते. तुम्ही जर नोकरी करत असाल आणि प्रोमोशन किंवा पगारवाढीची अपेक्षा असेल तर केवळ चांगला परफॉरमन्स करून चालणार नाही. आहे त्यापेक्षा जास्त क्षमतेने तुम्हाला प्रदर्शन करावे लागेल.
‘चांगला एम्लॉयी’ तो असतो ज्याच्यावर अवलंबून राहता येते, तो स्वयंप्रेरित, सक्रीय आणि मेहनती असतो, त्याच्यामध्ये नेतृत्वगुण असतात. अगदी कौशल्यपूर्ण असा आदर्श कर्मचारी त्याला म्हणता येईल असा.
पण मोठे यश मिळवायचे असेल तर यापेक्षा आणखी पुढे जाऊन एक ‘असाधारण’ कर्मचारी होण्याची तुम्हाला गरज आहे. असे कर्मचारी केवळ त्यांच्या कामात पारांगतच नसतात तर ते इतरांचीदेखील कार्यक्षमता वाढवतात. टीममधील ते ‘एक्स-फॅक्टर’ असतात. असाधारण कर्मचाऱ्यांची वैशिष्ट्ये काय असतात तर ते-
१. अपेक्षित कामापेक्षा जास्त मेहनत घेतात
मी कंपनीत अमुक पदावर काम करतो, माझी तमुक जबाबदारी आहे त्यामुळे मी हे काम करू शकत नाही, असे ते कधीच म्हणत नाहीत. काम कशा प्रकारे पूर्ण होईल यासाठी ते जॉब डिस्क्रिप्शनच्या पलीकडे जाऊन मेहनत घेतात. आणि जेव्हा एखादी समस्या उद्भवते तेव्हा ते कोणी सांगण्याच्या आधीच ती दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू करतात.
२. थोडेसे विक्षिप्त असतात
एकदम हुशार लोकांचे वागणे पाहिले तर ते थोडसं विक्षिप्त वाटते. बऱ्याचदा आपल्याच तंद्रीमध्ये असतात. ते इतरांपेक्षा थोडं वेगळं वागतात (पण चांगल्या अर्थाने). त्यांच्या विक्षिप्तपणामुळे ते इतरांमध्ये उठून दिसतात आणि कामाच्या ठिकाणी सकारात्मक ऊर्जा आणतात. लोक वेडे म्हणू देत पण मी काही झाले तरी हे काम पूर्ण करीन अशी वृत्तीच त्यांना वरचढ ठरवते.
३. त्यांना ‘मी’पणा कधी सोडायचा हे माहीत असते
ते वागायला जरी विक्षिप्त वाटत असले तरी कोणत्यावेळी आपले वेगळेपण बाजूला ठेवून टीम सदस्यांमध्ये मिसळून जाण्याचे असाधारण कौशल्य त्यांच्यामध्ये असते. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून ते चटकन स्वत:च्या वागण्यात योग्य तो बदल करतात. स्वत:चे वेगळेपण आणि सांघिक भावना बाळगणे या दोहोंचा मेळ बसवणे तसे अवघडच असते. म्हणूनच तर त्यांना ‘असाधारण’ म्हणतात.
४. सर्वांसमोर सहकाऱ्यांची स्तुती करतात
वरिष्ठांनी स्तुती केलेली कोणाला नाही आवडणार? परंतु आपल्याच सहकाऱ्यांच्या तोंडून चार कौतुकाचे शब्द ऐकणे किती मोठी बाब आहेश, हे आॅफिस पॉलिटिक्स जाणणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेगळे सांगण्याची गरज नाही. असाधारण कर्मचारी केवळ सहकाऱ्यांची प्रशंसाच नाही तर सर्वांसमोर त्यांच्या योगदानाबद्दल गौरवोद्गार काढतात. यामुळे सहकार्याची भावना वाढते.
५. मतभेद खाजगीमध्ये सांगतात
आपल्या सहकर्मचाऱ्यांसोबत आपण सहमत असूच असे नाही. परंतु आपले आक्षेप किंवा मतभेद सर्वांसमक्ष व्यक्त करण्याऐवजी ते खाजगीमध्ये सांगतात. म्हणजे मीटिंगच्या आधी किंवा नंतर एकट्यामध्ये सहकाऱ्याशी एकांतात बोलून दाखवतात. जेणेकरून दोघांमधील वाद किंवा मतभेद आॅफिसमध्ये गॉसिप बनणार नाही याची ते पुरेपुर काळजी घेतात.
६. निडरपणे प्रश्न विचारतात
बरेच कर्मचारी असे असतात जे मीटिंगीमध्ये उघडपणे बोलण्यास कचरतात. त्यांच्या मनातील प्रश्न बिनदिक्कतपणे मांडत नाहीत. असाधारण कर्मचारी मात्र निडरपणे प्रश्न विचारतात. न बोलल्या जाणाऱ्या विषयांवर चर्चा घडवून आणतात. ज्यामुळे आॅफिसमध्ये अधिक पारदर्शकता येऊन सर्वांच्याच मनावरचा शंकाकुशंकाचा ताण निवळतो.
७. त्यांना सतत नाविन्यतेचा ध्यास असतो
cnxoldfiles/span> पूर्ण करत नाही तर रोजच्या कामातसुद्धा नाविन्यता आणण्यासाठी त्यांची धडपड सुरू असते. सहजासहजी ते समाधानी होत नाहीत. चांगले कर्मचारी नेमून दिलेल्या कामाला ठरवून दिलेल्या पद्धतीने पूर्णत्वास नेतात; पण असाधारण एम्लॉयी स्वत:ची स्टाईल विकसित करतात. त्यांची ही अंगभूत खासियत असते.