​अँटिसेप्टिक हँडवॉशचे फायदे कमी नि तोटेच जास्त

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2016 05:03 PM2016-09-03T17:03:14+5:302016-09-03T22:33:14+5:30

‘एफडीए’ने अँटिबॅक्टेरिअल हँड वॉश किंवा बॉडी वॉश उत्पादनांमध्ये वापरण्यात येणाऱ्या ‘ट्रायक्लोसन’ आणि ‘ट्रायक्लोकार्बन’ या दोन सक्रीय घटकांवर अमेरिकेत बंदी घातली आहे.

The benefits of antiseptic handshaws are less and less expensive | ​अँटिसेप्टिक हँडवॉशचे फायदे कमी नि तोटेच जास्त

​अँटिसेप्टिक हँडवॉशचे फायदे कमी नि तोटेच जास्त

Next
्या हँड वॉशने हात धुण्यावर खूप जोर दिला जातो. मात्र अमेरिकेतील अन्न व औषध प्रशासनानुसार (एफडीए) सर्रास विक्री होणारी अँटिसेप्टिक साबण किंवा लोशन हात धुण्यासाठी सामान्य साबण किंवा पाण्यापेक्षा अधिक परिणामकारक असते हे सिद्ध करणारा कोणताही ठोस पुरावा नाही.

उलट ‘एफडीए’ने अँटिबॅक्टेरिअल हँड वॉश किंवा बॉडी वॉश उत्पादनांमध्ये वापरण्यात येणाऱ्या ‘ट्रायक्लोसन’ आणि ‘ट्रायक्लोकार्बन’ या दोन सक्रीय  घटकांवर अमेरिकेत बंदी घातली आहे. त्यामुळे या घटकांचा सामावेश असलेली हँड वॉश उत्पादने अमेरिकेत विकणे बेकायदेशीर ठरणार.

‘एफडीए’ने जाहिर केलेल्या निणर्यामध्ये सांगितले की, दीर्घकाळ दैनंदिन वापरासाठी हे घटक सुरक्षित आणि संसर्ग पसरवणाऱ्या जंतूना आळा बसवण्याकरिता सामान्य साबण व पाण्यापेक्षा अधिक प्रभावी असतात  हे सिद्ध करण्यात कंपन्या अयशस्वी ठरल्या आहेत. अँटिबॅक्टेरिअल साबण/लोशन जंतू प्रसरणामुळे होणाऱ्या आजारांपासून संरक्षण देण्यात साध्या पाण्यापेक्षा अधिक उपयुक्त असते याचा कोणताही शास्त्रीय पुरावा नाही.

cnxoldfiles/वाईप्स किंवा वैद्यकीय उपयोगातील अँटिबॅक्टेरिअल उत्पादनांना वगळ्यात आले आहे.

Web Title: The benefits of antiseptic handshaws are less and less expensive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.