तरूणांईमध्ये भिकबाळीची क्रेझ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2016 10:39 AM2016-09-20T10:39:09+5:302016-09-20T16:09:09+5:30

भिकबाळी या स्टाइलने तरूणांच्या मनावर राज्य केले असल्याचे दिसत आहे. भले ही स्टाइल जुनी किवा पारंपारिक असली तरी आजची तरूणाई हा दागिना घालून एक स्टाइल म्हणून मोठया रूबाबात फिरताना दिसत असते. एवढेच नाही तर या दागिनाचे वेध बॉलिवुड व मराठी चित्रपटांना देखील आवरला नाही.

Bhairabali Kraze in Tarunni | तरूणांईमध्ये भिकबाळीची क्रेझ

तरूणांईमध्ये भिकबाळीची क्रेझ

googlenewsNext
style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;">बेनझीर जमादार                                     
                                                            
                                                                    भिकबाळीची क्रेझ
भिकबाळी या स्टाइलने तरूणांच्या  मनावर राज्य केले असल्याचे दिसत आहे. भले ही स्टाइल जुनी किवा पारंपारिक  असली तरी आजची तरूणाई हा दागिना घालून एक स्टाइल म्हणून मोठया रूबाबात फिरताना दिसत असते. एवढेच नाही तर या दागिनाचे वेध बॉलिवुड व मराठी चित्रपटांना देखील आवरला नाही. खास तर या भिकबाळीचा जन्मच पुण्यात झाला आहे. त्यामुळे बाजीराव मस्तानी या चित्रपटात रणवीर सिंग तर मुंबई पुणे मुंबई या चित्रपटात स्वप्नील जोशी हे कलाकार भिकबाळी या लूकमध्ये पाहायला मिळाले. हे दोन्ही सुपरहीट चित्रपटदेखील पुणे या शहराशी संबंधित आहेत. पण आता ही भिकबाळी पुण्यापुरतीच मर्यादित न राहता संपूर्ण तरूणांईच या भिकबाळीच्या प्रेमात पडलेली दिसते. 
                                            भिकबाळीसाठी कॉश्च्युम महत्वाचा नाही
 कॅज्युअल शर्ट, जीन्स, टी शर्ट, शेरवानी अशा कोणत्याही कपडयांवर भिकबाळी सुट होती. त्यासाठी खास असाच एक प्रकारचा कॉश्च्युम परिधान करावा असे काही नाही. स्टाईलिश जीन्स, टी शर्ट, हातात भारी मोबाईल आणि कानात भिकबाळी असं चित्र गणेशोत्सवाच्या काळात हमखास पाहायला मिळाला. म्हणूनच भिकबाळी हा पारंपरिक दागिना आता ट्रेंडी आणि यंग लूकच्या पंक्तीत येऊन बसलाय. त्यामुळे पुण्यासोबतच मुंबई, नाशिक, सातारा या ठिकाणी ही भिकबाळीला तरुणांची पसंती मिळत आहे. तसेच गणेशोत्सव काळात कुर्ता, पायजमा, मोजडी किंवा एखादी कोल्हापुरी चप्पल या साजश्रृंगारात भिकबाळीमुळे सौदर्याला चार चाँद लागले आहेत. त्यामुळे गणेशोत्सावात भिकबाळीवाले अधिक भाव खाऊन गेले आहे. 
                
                                                          भिकबाळीची परंपरा
  भिकबाळीला पेशवेकालीन परंपरा असल्याचे मानतात. कितीही दागिने घातले, तरी नाकात सुंदर, मोत्यांची ठसठशीत नथ जशी स्त्री सौंदयार्ला शोभा आणते, तशीच दोन टप्पोरे मोती आणि मध्ये माणिक असलेली भिकबाळी पुरुषांचं सौंदर्य खुलवते.  पेशवेकाळात बुद्धिमत्ता, कर्तृत्व सिद्ध केल्यानंतर वस्त्रे, पगडी देऊन जेव्हा एखाद्याचा सन्मान केला जाई, त्यावेळी भिकबाळी दिली जात असे. भिकबाळी ही स्वतहून घालण्याची पद्धत नव्हती, ती सन्मानाने प्रदान करण्याची गोष्ट होती, अशा काही गोष्टी भिकबाळीबद्दल सांगितल्या जातात. 
          
                                                               भिकबाळी कशी घालावी?
 भिकबाळी ही उजव्या कानाच्या वरच्या बाजूला घातली जाते. अर्थात भिकबाळीमुळे आता बुद्धिमत्ता आणि कर्तृत्व सिद्ध होत नसले, तरी तुम्ही ट्रेंडी आहात की नाही हे मात्र नक्की सिद्ध होते.
 
                                                                             हटके लुक
भिकबाळी हा दागिना खरा सोन्यामध्येच प्राप्त होतो. सोन्याच्या तारेत मोती, माणिक किंवा मोती पोवळे गुंफून भिगबाळी तयार केली जाते. मात्र आता सोन्याबरोबरच, चांदीची किंवा खोटी भिगबाळीहीसुद्धा आता तयार करून मिळते. मोती आणि माणका ऐवजी रुद्राक्ष किंवा चांदीचे कोरीव मणी (बिड्स), टायगर आय सारखे दगड, लाकडी मणी हे देखील भिकबाळीसाठी वापरले जातात. चांदीच्या तारेतील या भिकबाळीही हटके लुक देऊ शकतात. तसेच मुलींसाठी भिकबाळीसारखाच बुगडी हा पयार्यदेखील उपलब्ध आहे. ही बुगडीदेखील सध्या ट्रेंडमध्ये आहे. बुगडी आणि त्याखाली भिकबाळी हा पर्यायही वेगळा लुक देऊ शकतो. 
 
                                                                             भिकबाळी कुठे मिळेल?
सराफ दुकानांमध्ये भिकबाळीची डिझाईन्स त्पाहायला मिळतात. छोटी, मध्यम, मोठी अशी हव्या त्या आकारत भिकबाळी मिळू शकते. सराफ दुकानांमध्ये भिकबाळीची डिझाईन्स तयारच पाहायला मिळतात. छोटी, मध्यम, मोठी अशी हव्या त्या आकारत भिकबाळी मिळू शकते. साधारणपणे पाचशे रुपयांपासून ते १० हजार रुपयांपर्यंत भिकबाळी मिळते. अमेझॉन, स्नॅपडिल, इ-बे या संकेतस्थळांवरही भिकबाळीची विक्री होत आहे.

Web Title: Bhairabali Kraze in Tarunni

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.