मोठ्या नाकांचा वर्ल्ड कप
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2016 03:42 PM2016-08-05T15:42:32+5:302016-08-05T21:12:32+5:30
‘बिग नोज वर्ल्ड कप’ असे त्याचे नाव आहे. यामध्ये जगभरातील मोठ्या नाकाचे अनेक हौशी सहभागी होतात.
‘बिग नोज वर्ल्ड कप’ असे त्याचे नाव आहे. यामध्ये जगभरातील मोठ्या नाकाचे अनेक हौशी सहभागी होतात. ‘मोठं नाक चांगलं नाक’ असे त्यांचे घोषणवाक्यच आहे. या वर्ल्डकपच्या वेळी एरलांगनमध्ये संपूर्ण आनंदाचे वातावरण असते. नृत्य, गाणी व खाणे पिणे याची मोठी चंगळ असते. या अनोख्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जर्मनी, इटली, स्वीडन, आॅस्ट्रिलिया, नेदरलॅण्डसह अन्य देशातील स्पर्धेक सहभागी होतात.
मात्र, अंतिम टप्यात फारच कमी स्पर्धक जातात. आपले नाक मोठं दिसण्यासाठी काहीजण नाकात कापूसही भरुन येतात. स्पर्धेचे नियम अतिशय कडक असल्यामुळे कोणी जर अशा प्रकारे नाकात कापूस टाकून चिटिंग करताना आढळला तर त्याला स्पर्धेत बाद करण्यात येते. त्याकरिता सुरुवातीलाच त्यांच्या नाकाची उपकरणाद्वारे तपासणी केली जाते.
तुमचेही नाक मोठे असेल तर त्याची लाज वाटू न देता, या अनोख्या स्पर्धेत सहभागी होण्याचा विचार करण्यास हरकत नाही. आपण कसे दिसतो यापेक्षा आपले विचार आणि वागणूक महत्त्वाची असते. त्यामुळे सौंदर्याच्याबाबतील कोणत्याच प्रकारचा न्युनगंड न बाळगता, आपण जसे आहोत त्याचा स्वीकार करावा.