विवाहापूर्वी सात वेळा भेटले बिल-मेलिंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2016 01:11 AM2016-01-16T01:11:51+5:302016-02-05T13:07:19+5:30
सार्वजनिक जीवनात समरस होण्यासाठी मेलिंडा गेट्स यांना वर्षे लागली.
स र्वजनिक जीवनात समरस होण्यासाठी मेलिंडा गेट्स यांना वर्षे लागली. आपले पती आणि जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती आणि मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांच्याविषयीसुद्धा त्या अतिशय मनमोकळेपणे बोलतात. विवाहापूर्वी एका शनिवारी सकाळी बिल यांनी आपल्याला कसे विविध प्रश्न विचारले आणि आपण त्यांना कसे निरुत्तर केले, याविषयी त्यांनी सांगितले. बिल यांनी मेलिंडा यांना दोन आठवड्याच्या आत एकत्र जेवणासाठी कार्यक्रम आखण्यास सांगितले. यावर मेलिंडा यांनी असे एकाएकी शक्य नसल्याचे सांगितले. पुन्हा कधी योग्य वेळ आल्यास असा कार्यक्रम आखू असे त्यांनी बिल यांना सांगितले. मेलिंडा या मायक्रोसॉफ्टमध्ये प्रॉडक्ट मॅनेजर होत्या तर बिल हे कंपनीचे सीईओ होते. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका मुलाखतीमध्ये मेलिंडा यांनी आपल्या भेटीविषयी माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, कॉलेजला असताना आमच्या अवतीछवती अतिशय बुद्धिमान विद्यार्थ्यांचे वतरुळ होते. यात मुलींचे प्रमाण फारच कमी होते. माझ्या कल्पनेतील व्यक्तिमत्व मला बिल यांच्यात दिसले. मला त्यांच्याविषयी नितांत आदर होता. त्यामुळे मी आपोआपच त्यांच्याकडे त्यांच्या बुद्धिमत्तेकडे आकर्षित होत गेले. दुसरे म्हणजे त्यांची चौकसवृत्ती. त्यांची विनोदबुद्धीही दाद देण्यासारखी आहे. या सर्व गोष्टींनी मला प्रभावित केले. याला रोमान्स म्हणता येणार नाही. बिल आणि मेलिंडा हे विवाहापूर्वी सात वेळा भेटले. फाऊंडेशनचे काम एकत्र सुरू केल्यावर ते मनाने अधिक जवळ येत गेले. त्यांची अधिक ओळख झाली. बिल म्हणतात, मला नेहमीच सहकार्याची गरज भासली आहे. सहकार्यासोबत काम करताना मला फार फायदा झाला आहे. मायक्रोसॉफ्टच्या सुरुवातीच्या काळात पॉल अँलेन यांची नवनवीन कल्पनांसाठी मला मदत झाली. नंतर स्टीव्ह बालमेर यांची मदत झाली. त्यांची ओळख महाविद्यालयीन जीवनातच झाली होती. त्यांचाही कंपनीच्या प्रगतीत फार मोठी मदत झाली. अशाच प्रकारची मदत आता मेलिंडा यांच्या रूपात होत आहे.