​गीतांबरोबरच बॉब डिलनच्या कुंचल्याचेही वेड

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2016 06:02 PM2016-11-05T18:02:50+5:302016-11-05T18:02:50+5:30

लंडनमधील हॅल्केयॉन गॅलरीमध्ये बॉब यांनी मागील दोन वर्षांत काढेलेल्या दोनशे पेंटिंग्सचे प्रदर्शन पाच नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे.

Bob Dylan's humiliation with lyrics | ​गीतांबरोबरच बॉब डिलनच्या कुंचल्याचेही वेड

​गीतांबरोबरच बॉब डिलनच्या कुंचल्याचेही वेड

Next
ान अमेरिक न गायक-गीतकार आणि नोबेल पारितोषिक विजेते बॉब डिलन केवळ त्यांच्या गीतांसाठी नाही तर त्यांच्या चित्रकारितेसाठीसुद्धा प्रसिद्ध आहे. लंडनमध्ये त्यांच्या कुंचल्यातून साकारलेल्या सुमारे २०० चित्रांचे प्रदर्शन भरवण्यात येत आहे.

त्यांच्या पेंटिग्समधून अमेरिकन जीवनपद्धती आणि संस्कृतीचे जिवंत चित्रण झळकते, असे कला समीक्षकांना वाटते. लंडनमधील हॅल्केयॉन गॅलरीमध्ये बॉब यांनी मागील दोन वर्षांत काढेलेल्या दोनशे पेंटिंग्सचे प्रदर्शन पाच नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे.

आॅईल, अ‍ॅक्रिलिक आणि वॉटरकलरचा सामावेश असणारी ही चित्रे या विसाव्यास शतकातील महान कलकाराची दुसरी बाजू दर्शवितात. काव्यत्मक गीतलेखनासाठी त्यांची यंदा साहित्यासाठी दिल्या जाणाºया नोबेल प्राईजकरिता निवड करण्यात आली. गीतलेखनासाठी हा पुरस्कार मिळवणारे ते पहिलेच संगीतकार आहेत.

                                  
                                  ग्रँड अ‍ॅरवोर बीचफ्रंट

                                  
                                  किचेनेट

                                  
                                 डान्स हॉल

त्यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर बरेच दिवस त्यांनी यावर कोणतीच प्रतिक्रिया दिली नव्हती. त्यामुळे उलटसुलट चर्चांना उधाण आले होते. काही दिवसांपूर्वी नोबेल प्राईज कमिटीने माहिती दिली की, बॉब यांनी फोन करून त्यांना पुरस्कारासाठी निवड केल्याबद्दल धन्यवाद दिले. मागच्या आठवड्यात स्वत: डिलन यांनी सांगितले की, मी डिसेंबर महिन्यात होणाऱ्या नोबेल पुरस्कार प्रदान सोहळ्यास हजर राहणार आहे.

हॅल्के यॉन गॅलरीचे अध्यक्ष पॉल ग्रीन म्हणतात की, ‘त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन आयोजित करणे आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. नोबेल प्राईज मिळाल्यामुळे तर हे एक्झिबिशन आणखीच स्पेशल झाले आहे.’

करिअरच्या सुरुवातीपासूनच बॉबला चित्रकलेची आवड होती. कॅनडाचा रॉक ग्रुप ‘द बँड’च्या ‘म्युझिक फ्रॉम बिग पिंक’ या अल्बमचे कव्हर त्यांनी डिझाईन केले होते. यापूर्वी त्यांच्या पेंटिग्सचे मिलान आणि न्यूयॉर्क  येथे प्रदर्शन झालेले आहे.

Web Title: Bob Dylan's humiliation with lyrics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.