​बॉलिवूड ‘मि. अ‍ॅँड मिस इंडिया २०१७’ स्पर्धेसाठी खानदेशातील ३१ जणांनी निवड !

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2017 10:32 AM2017-06-03T10:32:48+5:302017-06-03T16:40:38+5:30

जळगाव येथील आय. एन. आय. एफ. डी. या संस्थेच्या सहकार्याने दिल्ली येथील स्टुडिओ १९ फिल्म्स यांच्या मार्फ त बॉलिवूड ‘मि. अँड मिस इंडिया २०१७’ या स्पर्धेसाठी निवड चाचणी घेण्यात आली.

Bollywood 'm 31 candidates from Khandesh for the 'And Miss India 2017' competition! | ​बॉलिवूड ‘मि. अ‍ॅँड मिस इंडिया २०१७’ स्पर्धेसाठी खानदेशातील ३१ जणांनी निवड !

​बॉलिवूड ‘मि. अ‍ॅँड मिस इंडिया २०१७’ स्पर्धेसाठी खानदेशातील ३१ जणांनी निवड !

Next
ong>-Ravindra More
जळगाव येथील आय. एन. आय. एफ. डी. या संस्थेच्या सहकार्याने दिल्ली येथील स्टुडिओ १९ फिल्म्स यांच्या मार्फ त बॉलिवूड ‘मि. अँड मिस इंडिया २०१७’ या
स्पर्धेसाठी निवड चाचणी घेण्यात आली. या स्पर्धेत ८० मुला-मुलींनी सहभाग नोंदविला होता. त्यातून ३१ जणांची  निवड अंतिम फेरीसाठी करण्यात आली. यात २१ मुले व १० मुलींचा समावेश आहे. या स्पर्धेत ज्यांची निवड झाली त्या सर्व मुलांना बॉलिवूड तिकिट देण्यात आले. अंतिम फेरी  २४ जून रोजी पंचताराकित  हॉटेल क्राउन प्लाझा, नवी दिल्ली येथे होणार आहे. 

Displaying DSC_2421.jpg

मुलांमध्ये उत्साहाचे वातावरण असून त्या दुष्टिने मुलांनी पुढील स्पर्धेसाठी मेहनत घेण्यास सुरवात केली आहे. अंतिम फेरीच्या निवड चाचणीसाठी ज्यूरी म्हणून बॉलिवूड कलाकार अरबाज खान, सना खान, रजनीश दुग्गल,विशाल पांडे, यश अलवंत हे असणार आहेत. खान्देशातील तरुणांमधील कलागुणांना प्रोत्साहन मिळावे यासाठी आय. एन. आय. एफ. डी. या संस्थेच्या संचालिका संगीता  पाटील यांनी पुढाकार घेऊन या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. जळगावात असा इव्हेंट प्रथमच घेण्यात आला. या स्पर्धेत फॅशन डिझाईन, अभिनय आणि मॉडेलिंग यासाठी चाचणी घेण्यात आली. ज्युरी  म्हणून चित्रपट दिग्दर्शक विशाल दुग्गल, फॅशन डिझाइनर राशी वर्मा आणि आय. एन. आय. एफ. डी. च्या संचालिका संगीता पाटील यांनी काम पहिले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आय. एन. आय. एफ. डी. तील लक्ष्मी मलबारी, सुप्रिया जाधव, काजल महाजन, जयश्री मोरे, दीपाली काळे, अंजुलता सोनी, यांचे अनमोल सहकार्य मिळाले. 

Displaying DSC_2400.JPG
 

Web Title: Bollywood 'm 31 candidates from Khandesh for the 'And Miss India 2017' competition!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.