​पुस्तकवेडीने रंगविल्या पुस्तकी पायऱ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2016 04:33 PM2016-07-21T16:33:00+5:302016-07-21T22:03:00+5:30

पिपा ब्रॅनहामने आपल्या घरातील पायऱ्यांना पुस्तकांच्या कव्हरप्रमाणे रंगवून एक प्रकारे पुस्तकांचे आभारच मानले आहेत.

Bookstore Coloring Books Steps | ​पुस्तकवेडीने रंगविल्या पुस्तकी पायऱ्या

​पुस्तकवेडीने रंगविल्या पुस्तकी पायऱ्या

Next
स्तके आपले सर्वात चांगले मित्र असतात. आयुष्यात यशस्वीतेचा मार्ग आणि मंत्र दाखविणाºया पुस्तकांचे आभार तरी कसे मानायचे हा प्रश्न आहे. याचे फार छान उत्तर पिपा ब्रॅनहाम या महिलेकडे आहे.

या पुस्तक प्रेमीने आपल्या घरातील पायऱ्यांना पुस्तकांच्या कव्हरप्रमाणे रंगवून एक प्रकारे पुस्तकांचे आभारच मानले आहेत.

Book Stairs

लिव्हरपूल येथे राहणारी पिपा काही दिवसांपूर्वी नवऱ्या व मुलीसोबत नव्या अपार्टमेंटमध्ये राहाण्यास आली. आता नवे घर सजवावे तर लागणार. महागडे डेकोरेशन किंवा कारर्पेट खरेदी करण्याऐवजी तिने फार क्रिएटिव्ह मार्ग शोधनू काढला. ती सांगते, पिंटरेस्टवर फोटो पाहून मला पायऱ्यांना पुस्तकांच्या कव्हर-स्पाईनच्या डिझाईनने रंगवण्याची कल्पना सुचली.

Book Stairs

मग तिने स्वस्तात मिळणाऱ्या ग्लॉस आणि मॅट फिनिशेस् एमल्शन रंग, मास्किंग टेप, प्लास्टी कोट वार्निश स्प्रे विकत घेतले. आता फक्त घरातील तेरा पायऱ्यांसाठी कोणत्या पुस्तकांची निवड करायची तेवढे बाकी होते.

Book Stairs

मग तिने रेमंड फाईस्टचे ‘फेअरी टेल’, टोल्किनचे ‘लॉर्ड आॅफ द रिंग’, ‘द हॉबिट’, पीटर स्ट्रॉबचे ‘द तलिस्मा’, जॉर्ज मार्टिनचे ‘गेम आॅफ थ्रोन्स’, लुईस कॅरोलचे ‘थ्रू द लूकिंग ग्लास’, जेम्स हर्बटचे ‘द मॅजिक कॉटेज’, हेमिंगवेचे ‘द ओल्ड मॅन अँड द सी’, मोबी डिक, वुदरिंग हाईटस, अ‍ॅक्रॉस दी सी आॅफ स्टार्स, द स्पेस ट्रिओलाजी  यांची निवड केली.

Book Stairs

पिपा म्हणते की, ही पुस्तके मी जेव्हा वाचली होती तेच कव्हरस्पाईन मी पायऱ्यांवर चितारण्याचे ठरवले होते. म्हणून मग ग्रंथालये, मित्रपरिवर ज्यांच्याकडून मी पुस्तकं घेतले होते त्यांना फोटो काढून पाठवण्याची विनंती केली. त्यानुसार तिने केवळ १८० पौंड (सुमारे १६ हजार रु. ) आणि सहा आठवड्यात ३५ तास खर्च करून या जादुई पायऱ्या रंगवल्या आहेत.

Web Title: Bookstore Coloring Books Steps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.