​BSLN लवकरच उभारणार २५ हजार वायफाय स्पॉट !

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2017 01:04 PM2017-06-09T13:04:13+5:302017-06-09T18:34:13+5:30

डिजिटल इंडियाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारतर्फे लवकरच लहान शहर आणि ग्रामीण भागात २५ हजार वायफाय स्पॉट उभारले जाणार

BSLN will soon set up 25,000 Wi-Fi spots! | ​BSLN लवकरच उभारणार २५ हजार वायफाय स्पॉट !

​BSLN लवकरच उभारणार २५ हजार वायफाय स्पॉट !

Next
जिटल इंडियाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारतर्फे लवकरच लहान शहर आणि ग्रामीण भागात २५ हजार वायफाय स्पॉट उभारले जाणार असून त्यासाठी त्यासाठी दूरसंचार मंत्रालय बीएसएनएलबरोबर एक समजोता पत्रावर स्वाक्षरी करणार आहे. याबाबतची अधिक माहिती दूरसंचार मंत्री मनोज सिन्हा देणार आहेत, असे एका वृत्त वाहिनीने दिलेल्या माहितीवरु न समजले. 
वायफाय हॉटस्पॉट लावण्यासाठीचे कंत्राट बीएसएनएलतर्फे आयटीआयला देणार आहेत. दरम्यान, बीएसएनएलकडून फक्त इंटरनेट सुविधा पुरवण्यात येते. तर वायफाय इक्विपमेंट बनवण्याचे काम आयटीआयकडे असते. भविष्यात सरकार याचा विस्तार करणार असल्याचे सांगण्यात येते.
डिजिटल इंडिया अभियानातंर्गत इ-गर्व्हनन्सला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार सतत प्रयत्नरत असून शासन-प्रशासनामध्ये पारदर्शकता आणि गती निश्चित करण्यासाठी सरकारी सेवांना आॅनलाइन करण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळे बीएसएनएल आणि दूरसंचार मंत्रालयातील ही भागिदारी महत्वपूर्ण मानली जाते. 

Web Title: BSLN will soon set up 25,000 Wi-Fi spots!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.