जगभरातील उद्योगपतींना मिळेल प्रेरणा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2016 01:11 AM2016-01-16T01:11:29+5:302016-02-04T14:40:18+5:30
जगभरातील उद्योगपतींना मिळेल प्रेरणा फेसबुकचा सीईओ मार्क झुकेरबर्ग आणि त्याच्या पत्नीने ४५ बिलियन डॉलर्सचे दान करीत उद्योगपतींच्या क्षेत्रात दातृत्वाचा नवा पायंडा पाडला आहे
Next
ज भरातील उद्योगपतींना मिळेल प्रेरणा
फेसबुकचा सीईओ मार्क झुकेरबर्ग आणि त्याच्या पत्नीने ४५ बिलियन डॉलर्सचे दान करीत उद्योगपतींच्या क्षेत्रात दातृत्वाचा नवा पायंडा पाडला आहे. या दोघांपासून प्रेरणा घेत जगभरातील अनेक उद्योगपती आपल्या संपत्तीचा लक्षणीय भाग समाजसेवेसाठी देण्याकरिता पुढे येतील, असे निरीक्षण इंडियाना यूनिव्हर्सिटीच्या लिली फॅमिली स्कूल ऑफ फिलांथ्रोफीचे डीन आमिर पसिक यांनी नोंदवले. २0१0 मध्ये बिल गेट्स आणि वॉरेन बफेट यांनी एकत्र येऊन ह्यगिव्हिंग प्लेज ही संस्था स्थापन केली. तिच्या माध्यमातून जगातील १५ देशांचे १३८ अब्जधीश या संस्थेसोबत जोडले गेले आहेत. आधीच्या पिढीतील फोर्ड, रॉकफेलर यांसारख्या उद्योगपतींनंतर आताची उद्योगपतींची पिढी ही नव्या पद्धतीने दान करीत आहे.