पावसाळ्यातल्या वातावरणाचा आनंद साजरा करताना अंगावरही हवा निसर्गाचा साज.. यंदाच्या पावसाळ्यात बॉटनिकल ड्रेस घालून तर पाहा!

By admin | Published: July 14, 2017 04:20 PM2017-07-14T16:20:34+5:302017-07-14T16:45:22+5:30

फॅशनच्या जगतातील बॉटनिकल ड्रेस ट्राय करण्याचा हा अगदी परफेक्ट सीझन आहे.

Celebrating the rainy season while enjoying the nature of nature, look at the botanical dress in the rainy season! | पावसाळ्यातल्या वातावरणाचा आनंद साजरा करताना अंगावरही हवा निसर्गाचा साज.. यंदाच्या पावसाळ्यात बॉटनिकल ड्रेस घालून तर पाहा!

पावसाळ्यातल्या वातावरणाचा आनंद साजरा करताना अंगावरही हवा निसर्गाचा साज.. यंदाच्या पावसाळ्यात बॉटनिकल ड्रेस घालून तर पाहा!

Next



- मोहिनी घारपुरे-देशमुख



‘ बॉटनिकल ड्रेसेस’ नाव वाचून बुचकळ्यात पडलात ना .. ‘आता अभ्यासातली बॉटनी कपड्यांमध्ये कुठे टपकली’ असं काही वाटलं असेल तुम्हाला क्षणभर . पण थांबा, बॉटनिकल ड्रेस म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर आपल्या साध्या सोप्या भाषेत सांगायचं तर फ्लोरल प्रिंट असलेले झुळझुळीत कपडे. या प्रिंट्समध्ये विविध प्रकारची फुलं, तऱ्हेतऱ्हेची पानं यांच्या छटा दाखवलेल्या असतात. प्रत्येकच वेळेला या प्रिंट्ससाठी सिमेट्रीचा वापर केला जायलाच हवा असंही बंधन नाही. त्यामुळे ड्रेसला शोभेल अशा रितीनं आणि साधारणत: हटके परंतु तरीही ड्रेसची आकर्षकता कमी होणार नाही अशा प्रकारे ही प्रिंट या ड्रेसवर ठिकठिकाणी दिल्याचं दिसतं.

पावसाळा आणि बॉटनिकल ड्रेस  
पावसाळा म्हणजे हिरवा ॠतू. जिकडे तिकडे निसर्गाचं सौंदर्य बहरलेलं सध्या दिसतं आहे. हिरवेगार गवत, वृक्षवेली वाऱ्यावर डोलत आहेत. छोटी छोटी रंगीबेरंगी फुलं इवल्या इवल्या पानांमधून वाऱ्यासंगे डोकावून बघत आहेत. सृष्टीचा असा साज फक्त पावसाळ्यातच पाहायला मिळतो. मग हा आनंद आपणही साजरा करायला हवा ना. त्यासाठीच फॅशनच्या जगतातील बॉटनिकल ड्रेस ट्राय करण्याचा हा अगदी परफेक्ट सीझन आहे.
एरवी फुलाफुलांच्या डिझाईनचे कपडे लहान आणि किशोरवयीन मुलींच्या वॉर्डरोबमध्ये हमखास बघायला मिळतात. पण बॉटनिकल ड्रेसेस पंचविशीपासून ते अगदी पस्तीशीपर्यंतच्या बायकाही आरामात घालू शकतात. विशेषत: पावसाळ्यातल्या संध्याकाळी कुठे बाहेर फिरायला जाताना बॉटनिकल ड्रेसेस तुम्ही परिधान केलेले असतील तर बाहेरच्या वातावरणाशी तुमचा लूक एकदम मॅच होवून जाईल. आपला आणि वातावरणाचा मूड एकच असेल तर एकदम भारी वाटतं.

 

Web Title: Celebrating the rainy season while enjoying the nature of nature, look at the botanical dress in the rainy season!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.