स्वस्तात मस्तातले मोबाइल स्टॅण्ड

By admin | Published: April 12, 2017 01:17 PM2017-04-12T13:17:15+5:302017-04-12T13:17:15+5:30

महागडे मोबाइल मोठ्या हौशीनं घेतो. पण घरात गेल्यावर ते कुठेही ठेवतो. मोबाइलच्या विश्रांतीसाठी योग्य जागा बनवणंइतकं काही अवघड नसतं.

Cheap mobile phone stand | स्वस्तात मस्तातले मोबाइल स्टॅण्ड

स्वस्तात मस्तातले मोबाइल स्टॅण्ड

Next

-सारिका पूरकर-गुजराथी

मोबाइल आज जणू काही माणसाच्या जगण्याची गरज झाला आहे. साहजिकच घराघरात प्रत्येक व्यक्तीकडे एक असे किमान चार मोबाइल्स तरी असतातच. एरवी ते कायम हातात, खिशात किंवा पर्समध्ये असतात. परंतु, काही वेळासाठी का होईना त्यांना हातावेगळं करावं लागतंच. मग कोणी मोबाइल टेबलवर ठेवतो, कुणी फ्रीजवर ठेवतो तर कोणी टिपॉय नाहीतर बेडवर. काही काही घरात तर महागडे फोन अक्षरश: कुठेही ठेवलेले असतात.


हजारो रूपये मोजून खरेदी केलेला मोबाइल. त्याच्या विश्रांतीसाठी चांगली सोय करणं हे ही महत्त्वाचं असतं. त्यासाठी मोबाइल स्टॅण्ड हे उत्तम पर्याय. कमीत कमी खर्चातले चांगले मोबाइल स्टॅण्ड आपण अगदी घरीच बनवू शकतो.
घरच्याघरी मोबाइल स्टॅण्ड

१) टॉयलेट पेपरचे रोल (टिश्यू पेपर) संपले की ते फेकून दिले जातात. ते फेकून न देता या रोलवर छान प्रिंटेड डिझाइनचा कागद चिकटवा, कापड चिकटवा. वाटलं तर छान लेस लावा. मध्यभागी छोटासा चौकोनी तुकडा कापून मोबाईल या जागेत बसेल असं बघा.  या सजवलेल्या रोलला खालून स्टॅण्ड म्हणून बाजारात मिळतात ती हूक लावा.


२) जुन्या प्लास्टिकच्या बाटल्या कापून त्याला रंगवून घ्या. अडवकण्यासाठी मागील भाग उंच राहील याची काळजी घ्या. त्या भागावर एक भोक करून खिळ्यावर अडकवू शकता.

३) आईस्क्रिमच्या काड्यांपासूनही छान स्टॅण्ड बनतो. प्रथम सहा काड्या एकाला एक (चटई बनेल अशा रितीनं) कडांवर चिकटवून घ्या. नंतर या चौकोनाच्या रूंदीच्या बाजूनं (उंचीच्या नाही) किंचित आतील बाजूवर दोन काड्या उभ्या चिकटवून घ्या. काड्यांची दोन्ही टोकं चौकोनाबाहेर हवीत. आता एकदा दोन काड्या चौकोनाच्या वरच्या आणि खालच्या बाजूवर आडव्या आणि उभ्या चिकटवत चला. म्हणजे एक काड्यांचा चौकोनी थर तयार होईल, या पोकळ भागातच मोबाईल ठेवता येईल. थोडा उंच थर झाला की मग फक्त तीन काड्या चिकटवत चला (डावीकडे उभी एक, वरच्या बाजूला आडवी एक आणि उजवीकडे उभी एक). मोबाईलची पाठ टेकेल इतका हा थर किंचित उंच करा. झाला स्टॅण्ड तयार.


४) वापरात नसलेल्या जीन्सचे खिसे कापून घ्या. हे खिसे एका चौकोनी हार्डबोर्डवर किंवा एका कापडावर (यात आतमध्ये फोम भरा, म्हणजे खिशाला तो आधार बनेल) चिकटवून अथवा शिवून घ्या. आणि अडकवा.

५) जीन्स खिशांना वरती कापडाचेच हॅण्डल बनवून थेट खिसाच स्टॅण्ड म्हणून भिंतीवर, एखाद्या हूकवर अडकवू शकता.

६) मोबाईल जेव्हा तुम्ही खरेदी करता, तेव्हा तो बॉॅक्समध्ये मिळतो. या बॉक्सलाच त्याचे स्टॅण्ड बनवता येतं. यासाठी बॉक्स आडवा ठेवा, वरच्या बाजूवर मोबाईल आत बसेल एवढा चौकोनी तुकडा कापून घ्या. या बॉक्सला तुम्ही रंगवून, कागद चिकटवून डेकोरेट करु शकता.


७) चार पेन्सिल्स घ्या (ड्रॉर्इंग करता वापरतो त्या).फोनची जाडी जास्त असेल तर जास्त पेन्सिल लागतील. दोन पेन्सिलना दोन टोकांवर रबर बॅण्ड लावून अडकवा. टोकापासून आत रबर बॅण्ड लावा. यावर फोन आडवा ठेवता येईल. टेकू बनविण्यासाठी दोन पेन्सिल्स या आडव्या पेन्सिल्सना त्रिकोणी आकारात रबर बॅण्ड लावून अडकवून घ्या. मुख्य आधार बनवण्यासाठी त्रिकोणाच्या एका बाजूला एक पेन्सिल रबर बॅण्डनं उभी अडकवा की झाला स्टॅण्ड तयार.

 

Web Title: Cheap mobile phone stand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.