मुलांनो, अशी करा हेअर स्टाईल !

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2017 05:58 PM2017-01-03T17:58:03+5:302017-01-03T18:08:30+5:30

तरुणाईत प्रत्येकाला इतरांपेक्षा हटके दिसायला आवडते. त्यासाठी तरूण वेगवेगळी वेशभूषा तर करतोच शिवाय हेअर स्टाईलदेखील आकर्षक असण्यासाठी प्रयत्नशील असतो.

Children, make this hair style! | मुलांनो, अशी करा हेअर स्टाईल !

मुलांनो, अशी करा हेअर स्टाईल !

googlenewsNext
ong>-Ravindra More

तरुणाईत प्रत्येकाला इतरांपेक्षा हटके दिसायला आवडते. त्यासाठी तरूण वेगवेगळी वेशभूषा तर करतोच शिवाय हेअर स्टाईलदेखील आकर्षक असण्यासाठी प्रयत्नशील असतो. यामागचे कारण बहुतांश आपल्या आवडत्या मुलीने आकर्षित व्हावे, ही मानसिकताही असू शकते. यासाठी खालील विविध हेअर स्टाईल फॉलो करून आपण नक्कीच आकर्षक आणि हटके दिसू शकाल. 



द बेड हेड स्टाईल
या स्टाईलमध्ये झोपेतून उठल्यावर केस जसे विस्कळीत दिसतात तसे केस ठेवले जातात. या प्रकारच्या हेअर स्टाईलने तरुणी नक्कीच आकर्षित होऊ शकतात. कुठल्याही प्रकारच्या चेहऱ्याला हा उठून दिसतो. यासाठी केस लांब असणे आवश्यक आहे. जेणेकरून त्याला जेल लावून ते संपूर्ण मागे घेता येतील.



पारंपरिक हेअर स्टाईल
कॉन्झरवेटीव्ह हेअर कट म्हणजेच पारंपरिक हेअर स्टाईल होेय. हा हेअर कट मुलांना ‘मॅनली’ अर्थात परिपक्व रूप देतो. यासाठी सुरुवातीला थोडे केस वाढवून मग हेअर कट करायला हवे. केस अधिक आकर्षक दिसण्यासाठी तेल व शॅम्पू तसेच इतर संबंधित उत्पादने चांगल्या दर्जाची वापरावीत. 



साईड क्रॉप हेअर स्टाईल
हेअर स्टाईलच्या या प्रकारात केस चोहोबाजूंनी अत्यंत कमी असतात. मात्र, वरुन जरा लांब ठेवले जातात. नोकरीपेशा तरुणांनी हा हेअरकट करताना अगोदरच विचार करावा. कदाचित आॅफिसमध्ये तो उठून दिसेलच असे नाही.



द हॉट रेट्रो लूक
जुन्या रॉक अ‍ॅन्ड रोल काळातील ही स्टाईल आहे. सर्वात वरचे केस मागे काढून बाकीचे मोकळे सोडून देणे. यातही इतरांपेक्षा वेगळे दिसण्यासाठी काही नाविण्यपूर्ण प्रकार करता येतील.

Web Title: Children, make this hair style!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.