CHOCOLATE DAY SPECIAL : हेल्दी स्टाईलने साजरा करा ‘चॉकलेट डे’!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2017 07:08 AM2017-02-08T07:08:28+5:302017-02-08T12:38:28+5:30
९ फेबु्रवारी रोजी ‘चॉकलेट डे’ हेल्दी स्टाईलने साजरा करा. यामुळे आपला पार्टनर आनंदी तर होईलच शिवाय आपण त्याच्यासोबत मनमोकळ्या गप्पादेखील मारु शकणार.
Next
आपले प्रेम व्यक्त करणे आणि पार्टनरला मनविण्याचा सर्वात चांगला पर्याय चॉकलेट देणे होय. मात्र बरेचजण चॉकलेटला जंकफूड समजून आरोग्यासाठी हानिकारक मानतात. मात्र एका अभ्यासानुसार चॉकलेट आरोग्यासाठी फायदेशीर असल्याचे सांगण्यात आले आहे. तर ९ फेबु्रवारी रोजी ‘चॉकलेट डे’ हेल्दी स्टाईलने साजरा करा. यामुळे आपला पार्टनर आनंदी तर होईलच शिवाय आपण त्याच्यासोबत मनमोकळ्या गप्पादेखील मारु शकणार. आज हेल्दी स्टाईलने ‘चॉॅकलेट डे’ कसा साजरा करावा याबाबत जाणून घेऊया.
* होममेड चॉकलेट उत्तम
असे म्हटले जाते की, कोणतेही गिफ्ट स्वत: तयार केले असेल तर ते जगातील सर्वात चांगले गिफ्ट मानले जाते. जर आजच्या दिवशी आपल्या पार्टनरला जास्तच आनंदी व हेल्दी बनवायचे असेल तर त्यांना स्वत:च्या हाताने बनविलेले चॉकलेट द्या. हे केवळ हेल्दीच नव्हे तर आपल्या पार्टनरला ‘चॉकलेट डे’ निमित्त एक चांगले गिफ्टदेखील मिळेल.
* शुगर फ्री चॉकलेट द्या
आपल्या पार्टनरला चॉकलेट्सची क्रेज असो ना असो मात्र आपणास त्याच्या आरोग्याची काळजी घ्यायची आहे. यासाठी आपण शुगर फ्री चॉकलेटस्ची निवड करु शकता. बाजारात अशा प्रकारचे चॉकलेट्स सहज उपलब्ध असतात.
* डार्क चॉकलेट्स आहे सर्वाेत्तम
बऱ्याच संशोधनात डार्क चॉकलेट आपल्या ह्रदयासाठी उपयुक्त असल्याचे स्पष्ट झाले आहे. जर आपणास आपल्या पार्टनरचे मन जिंकायचे असेल तर कोणतेही चॉकलेट देण्याऐवजी डार्क चॉकलेट द्या. यामुळे त्याच्या ह्रदयाची काळजी घेतली जाईल.
* कमी कॅलरीयुक्त चॉकलेट द्या
‘चॉकलेट डे’ला पार्टनरला आनंदी आणि हेल्दी ठेवण्यासाठी चॉकलेट देताना कॅलरीचापण विचार करावा. विशेष म्हणजे चॉकलेटमध्ये जास्त प्रमाणात कॅलरीज असतात. आपण जे चॉकलेट देणार आहात त्यात कमी कॅलरीज असतील असेच चॉकलेट द्या.
* फ्रूट अॅण्ड क्रॅकर चॉकलेट
आपल्या पार्टनरचे मन जिंकण्यासाठी पूर्ण तयारी केली असेल तर ‘चॉकलेट डे’ ला कंजुसी का करावी? आपल्या पार्टनरला आनंदी करण्यासाठी ड्राय फ्रूट्सयुक्त चॉकलेट्सची निवड करा. या चॉकलेट्समुळे आपला पार्टनर आनंदी तर होईल शिवाय त्याच्यासाठी खूप उपयुक्तदेखील ठरणार आहे.
* कुकीज आणि ब्राऊनी
‘चॉकलेट डे’ला आपल्या पार्टनरला चॉकलेटच द्यावे असे नाही. यादिवशी आपण चॉकलेट व्यतिरिक्त चॉकलेटयुक्त कुकीज, ब्राऊनी किंवा केकसारख्या वस्तूही गिफ्ट देऊ शकता. हे नक्कीच आपल्या पार्टनरला आवडेल शिवाय त्याचे आरोग्यही चांगले राहील.
* ‘चॉकलेट डे’ला करा चॉक लेट मसाज
आपला पार्टनर हेल्दी राहण्यासाठी ‘चॉकलेट डे’ ला एक सरप्राइज म्हणून चॉकलेट मसाजची व्यवस्था करू शकता. यामुळे आपल्या पार्टनरचे आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होईल शिवाय पार्टनरचे मनही जिंकू शकता.
खरंच आपण आपल्या पार्टनरसोबत हेल्दी स्टाइलने ‘चॉकलेट डे’ साजरा करु इच्छिता तर या टिप्सदेखील फॉलोे करणे चुकवू नका. कारण नुकताच झालेल्या सर्वेक्षणात महिलांना फ्लॉवर्स, ड्रिंक आणि सेक्सपेक्षा जास्त चॉकलेट्स पसंत असतात. मग आपण समजू शकता की ‘चॉकलेट डे’ आपल्यासाठी किती महत्त्वाचा आहे.
Also Read : PROPOSE DAY SPECIAL : मुलीला प्रपोज करायचंय? वापरा या १० क्रिएटिव्ह टिप्स !
VALENTINE SPECIAL : वयाने लहान व्यक्तीवर प्रेम करत असाल तर या गोष्टींकडे लक्ष द्या !