कानातले घेताय? आधी आरशात चेहरा पाहिला का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 07:03 PM2017-08-22T19:03:56+5:302017-08-22T19:08:58+5:30

केवळ कानातलं छान आहे म्हणून ते तुमच्या चेह-याला सूट होईलच असं नाही. आपण घातलेल्या कपड्यांशी, कपड्यांच्या रंगांशी मेळ साधणारे आणि आपल्या चेह-याशी सुसंगत असे कानातले घातले तर तुम्ही आणखी उठावदार दिसाल हे नक्की.

Choose earrings as your face shape. | कानातले घेताय? आधी आरशात चेहरा पाहिला का?

कानातले घेताय? आधी आरशात चेहरा पाहिला का?

Next
ठळक मुद्दे* आयताकृती चेहरा. अशा चेह-याच्या मुलींनी साधारणत: थोडेसे लटकणारे पण भरगच्च असलेले कानातले घालावेत.* चौकोनी चेहरा असेल तर लांब, अंडाकृती आकाराचे, नाजूकसे कानातले निवडावेत. किंवा ठसठशीत असे टॉप्स (कानातले) ही छान दिसतील.* अंडाकृती चेह-याच्या तरूणींना कोणतेही कानातले छानच दिसतात. साधे टॉप्स, हलकेसे त्रिकोणी, लोंबते कानातले छान दिसतात.




- मोहिनी घारपुरे-देशमुख

सजणंधजणं कानातल्यांशिवाय पूर्ण होणं अशक्यच. हल्ली तर फॅशननुसार, ट्रेण्डनुसार कानातले निवडण्याचा आग्रह असतो. पण कानातले निवडताना आणखी एका गोष्टीकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. चेह-याच्या आकाराशी, रंगाशी सुसंगत कानातले घालणं फारमहत्त्वाचं असतं. केवळ कानातलं छान आहे म्हणून ते तुमच्या चेह-याला सूट होईलच असं नाही. आपण घातलेल्या कपड्यांशी, कपड्यांच्या रंगांशी मेळ साधणारे आणि आपल्या चेह-याशी सुसंगत असे कानातले घातले तर तुम्ही आणखी उठावदार दिसाल हे नक्की.

चेहे-यानुसार कानातले

1. आयताकृती चेहरा

काहीसा उभट आणि रूंदीला कमी असा चेहरा म्हणजे आयताकृती चेहरा असं म्हणता येईल. हनुवटीपाशी हा चेहरा निमुळता झालेला असतो. अशा चेह-याच्या मुलींनी साधारणत: थोडेसे लटकणारे पण भरगच्च असलेले कानातले घालावेत. भरगच्च म्हणजे द्राक्षाचा गड जसा दिसतो त्याप्रमाणे डिझाईन असलेले पण हनुवटीच्या रेषेपर्यंत लांबीला असलेले हे कानातले घालून तुमच्या चेहे-याला काहीसा भरीव आकारही येईल आणि हे कानातले तुमच्यावर खुलून दिसतील.

 


 

2. चौकोनी चेहरा

लांबी, रूंदीला काहीसा समान असलेला हा चेहरा आणि हनुवटीही काहीशी चौकोनी असेल तर लांब, अंडाकृती आकाराचे, नाजूकसे कानातले निवडावेत. किंवा ठसठशीत असे टॉप्स (कानातले) ही छान दिसतील. फक्त ते आकाराने मोठे आणि भरीव डिझाईन असलेले हवेत.

3. बदामी चेहरा

तुमचा चेहरा जर बदामी असेल तर तुम्ही झुमके वापरायला हवेत. किंवा, वरच्या बाजूला निमुळते आणि खालच्या बाजूला रूंद होत जाणारे, लटकनही तुमच्या चेहे-याला शोभून दिसतील.
 

4. अंडाकृती चेहरा

या चेह-याच्या तरूणींना कोणतेही कानातले छानच दिसतात. साधे टॉप्स, हलकेसे त्रिकोणी, लोंबते कानातले या चेह-यावर छान दिसतात. जर तुम्हाला वेगवेगळे कानातले ट्राय करायला आवडत असतील आणि तुमचा चेहरा जर अंडाकृती असेल तर तुम्ही या बाबतीत फार लकी आहात, कारण, तुमच्या चेह-यावर कोणत्याही प्रकारचे कानातले उठून दिसतील.

 

 

5. डायमंड चेहरा -

साधारणत: हनुवटीपाशी हा चेहरा लांब आणि निमुळता होत जातो. या चेह-याच्या तरूणींना टेझल कानातले, मोठे झुमके छान दिसतात.
 

 

6. गोलाकार चेहरा

या चेहे-याला लोंबते, निमुळते किंवा टॉप्स छान दिसतात. फक्त असे कानातले निवडताना ते चांगल्या प्रतीचेच असावेत अन्यथा ते चीप दिसू शकतात. आफ्टरआॅल, सौंदर्यसम्राज्ञी ऐश्वर्या रायच्या चेह-याप्रमाणे तुमचा चेहराही गोलाकार आहे, त्यामुळे तुम्ही कानातले जरा विचार करूनच निवडायला हवेत... नाही का?

 

Web Title: Choose earrings as your face shape.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.