क्लिओपात्रा सुंदर दिसण्यासाठी गुलाबपाणी वापरायची. असं आहे काय या गुलाबपाण्यात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2017 07:23 PM2017-09-04T19:23:15+5:302017-09-04T19:30:08+5:30

तुमची त्वचा कोरडी असो की तेलकट किंवा मिश्र. सर्व प्रकारच्या त्वचेसाठी गुलाबपाणी उत्तम आहे. अगदी क्लिओपात्राही आपल्या त्वचेची काळजी घेण्यासाठी गुलाबपाणीच वापरायची.

Clioapatra also use rose water. you know about benefits from rose water? | क्लिओपात्रा सुंदर दिसण्यासाठी गुलाबपाणी वापरायची. असं आहे काय या गुलाबपाण्यात?

क्लिओपात्रा सुंदर दिसण्यासाठी गुलाबपाणी वापरायची. असं आहे काय या गुलाबपाण्यात?

Next
ठळक मुद्दे* गुलाबपाणी त्वचेस लावलं तर त्वचा ओलसर राहण्यास मदत होते.* मेकअप सेटर म्हणून गुलाबपाणी चांगलं काम करतं.* मेकअप सेट करण्यासाठी जसा गुलाबपाण्याचा उपयोग होतो तसाच मेकअप काढण्यासाठीही गुलाबपाण्याचा उपयोग होतो.

- माधुरी पेठकर



सौंदर्याबद्दल जागरूक असाल तर आपल्या घरात गुलाब पाण्याची एक बाटली असायलाच हवी. सौंदर्योपचारात गुलाब पाणी महत्त्वाची भूमिका बजावतं. मग तुमची त्वचा कोरडी असो की तेलकट किंवा मिश्र. सर्व प्रकारच्या त्वचेसाठी गुलाबपाणी उत्तम आहे. अगदी क्लिओपात्राही आपल्या त्वचेची काळजी घेण्यासाठी गुलाबपाणीच वापरायची. क्लिओपात्रा गुलाब पाणी वापरत असेल तर मग नक्कीच गुलाब पाण्यात राम आहे असं म्हणायला हरकत नाही.
 

 

गुलाबपाण्यात असतं काय?

1. गुलाबपाण्यामुळे त्वचेवरील जास्तीचं तेल निघून जातं. त्वचेचा ‘पी एच’ बॅलन्स सुधारतो.
2. आग शांत करणारे घटक गुलाबपाण्यात असतात. त्यामुळे त्वचेची आग होत असल्यास गुलाब पाणी वापरल्यास आराम मिळतो. त्वचा लाल होवून सूज येत असेल , जळजळ होत असेल किंवा गजकर्ण सारख्या त्वचेच्या विकारातही गुलाबपाणी उत्तम उपायकारक ठरतं.
3. गुलाबपाणी त्वचेस लावलं तर त्वचा ओलसर राहण्यास मदत होते. त्वचा पुर्नज्जिवित होते. त्वचेवर नवचैतन्य येतं.
4. गुलाबपाण्यात अ‍ॅण्टिआॅक्सिडंट घटक असल्यानं त्वचेच्या पेशी बळकट होतात. त्यामुळे त्वचेच आरोग्य सुधारतं.
5. गुलाबपाण्यात अ‍ॅस्ट्रीजण्ट सारखे घटक असल्यामुळे गुलाबपाणी लावल्यास त्वचा स्वच्छ होते. त्वचेची मोकळी छिद्र बंद होतात. त्वचेचा टोन सुधारण्यास गुलाबपाण्यामुळे मदत होते.
6. गुलाब पाण्याचा सुगंधात मोठी ताकद असते. त्यामुळे मूड सुधारतो. मनातली भिती जाते. छान वाटण्यास मदत होते.
7. गुलाबपाण्यात पोषणाची क्षमता उत्तम असते. त्यामुळेच केसांच्या आरोग्यासाठी गुलाबपाणी उपयुक्त असते. केसांच्या मुळांशी कोंड्यामुळे आग होत असेल तर ही आग शमवण्याच काम गुलाबपाणी करतं.
8.रात्री शांत आणि चांगली झोप येण्यासाठी, झोपेच्या वेळेस प्रसन्न वाटण्यासाठी उशीवर गुलाबपाणी शिंपडावं.
9. गुलाबपाण्यामुळे त्वचेवर वयाच्या खुणा दिसत नाहीत.


सौंदर्यासाठी गुलाबपाणी
1 मेकअप सेटर म्हणून गुलाबपाणी चांगलं काम करतं. मेकअपआधी चेहेरा धुवून झाल्यावर गुलाबपाणी चेहेºयास लावावं. ते दोन तीन मीनिटं वाळून द्यावं आणि मग मेकअप करावा. यामुळे चेहे-यावर मेकअप चांगला बसतो.
2. कोरड्या केसांसाठी समप्रमाणात गुलाबपाणी आणि ग्लिसरीन घ्यावं. हे मिश्रण केसांच्या मुळाशी मसाज करून लावावं. ते अर्धा तास तसंच केसात मुरू द्यावं आणि नंतर शाम्पूनं केस धुवावेत.
3. गुलाबपाणी क्लीन्जर म्हणून काम करतं. फेस वॉशनं चेहेरा धुतल्यानंतर एक चमचा गुलाबपाण्यात काही थेंब ग्लिसरीन मिसळून ते मिश्रण चेहे-यास लावावं.
4. डोळांचा थकवा घालवण्यासाठी कापसाचा बोळा गुलाबपाण्यात बुडवून ते बोळे डोळ्यावर काही वेळ ठेवावे. त्यामुळे डोळ्यास आराम मिळतो. डोळ्यांची जळजळ थांबते. आणि डोळ्यांखाली आलेली सूजही कमी होते.
5. केसांना शाम्पू केल्यानंतर केस धुताना शेवटी एक कप गुलाबपाणी केसांवर घालावं. यामुळे केसांना चमक येते.
6. चेहे-यावरील डाग घालवण्यासाठी एक चमचा लिंबू रस, एक चमचा गुलाब पाणी घ्यावं आणि ते चेहे-यास लावावं. अर्धा तासानं चेहेरा पाण्यानं धुवावा.
7 . मेकअप सेट करण्यासाठी जसा गुलाबपाण्याचा उपयोग होतो तसाच मेकअप काढण्यासाठीही गुलाबपाण्याचा उपयोग होतो. यासाठी गुलाबपाण्यात थोडे नारळाच्या तेलाचे थेंब टाकावे. आणि ते मिश्रण चेहे-यास लावावं. या मिश्रणाचा उपयोग त्वचेचं आरोग्य सुधारण्यास होतो.
8. दोन चमचे बेसन पीठ , त्यात लिंबाचा रस घालून हे मिश्रण गुलाबपाण्यानं भिजवून त्याचा लेप करावा. आणि तो चेहे-यास लावावा. पंधरा मीनिटांनी लेप धुवून टाकावा. यामुळे चेहे-यास आलेला काळेपणा निघून जातो.

 

 

Web Title: Clioapatra also use rose water. you know about benefits from rose water?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.