कॉलरचे कलर काय सांगतात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 07:08 PM2017-12-14T19:08:09+5:302017-12-14T19:14:24+5:30

व्हाइट कॉलर्ड, ब्लू कॉलर्ड, पिंक कॉलर्ड, ग्रीन कॉलर्ड अशा संज्ञा म्हणूनच प्रचलित झाल्या. या वर्गीकरणामुळे सामाजिक स्थिती अभ्यासणं सोपं झालं. या प्रत्येक संज्ञेचा इतिहास मोठा रंजक आहे.

collars colour say manythings. Very intresting history behind this! | कॉलरचे कलर काय सांगतात?

कॉलरचे कलर काय सांगतात?

Next
ठळक मुद्दे* व्हाईट कॉलर वर्कर ही संज्ञा सर्वप्रथम 1930 मध्ये सुप्रसिद्ध लेखक आॅप्टन सिंक्लेअर यांनी वापरली. कारकुन, व्यवस्थापन विषयक आणि प्रशासन विषयक काम करणा-या सर्वांना ही संज्ञा लागू करण्यात आली.* ब्लू कॉलर ही संज्ञा सर्वप्रथम 1924 मध्ये वापरली गेली. कष्टाची कामे करणा-या कामगारांना किंवा रोजंदारीवर काम करणा-या कामगारांना ही संज्ञा लागू होते.* अत्यंत महत्त्वपूर्ण कामं करणा-या आणि प्रचंड मागणी असणा-या कामगारांकरीता गोल्ड कॉलर ही संज्ञा प्रचलित आहे.

 

मोहिनी घारपुरे-देशमुख

कॉलर ही फक्त कपड्यांचा भाग नाही की फक्त फॅशनची बाबही नाही. तर कॉलरमुळे सामाजिक वर्गीकरणही व्हायचं हे कोणी सांगितलं तर विश्वास बसेल? विसाव्या शतकाच्या मध्यात कामाच्या ठिकाणी वापरण्यात येणा-या पोषाखाच्या कॉलरच्या रंगावरून सामाजिक वर्गीकरण करण्याची सुरूवात झाली.

व्हाइट कॉलर्ड, ब्लू कॉलर्ड, पिंक कॉलर्ड, ग्रीन कॉलर्ड अशा संज्ञा म्हणूनच प्रचलित झाल्या. या वर्गीकरणामुळे सामाजिक स्थिती अभ्यासणं सोपं झालं. या प्रत्येक संज्ञेचा इतिहास मोठा रंजक आहे.

 

व्हाईट कॉलर वर्कर ही संज्ञा सर्वप्रथम 1930 मध्ये सुप्रसिद्ध लेखक आॅप्टन सिंक्लेअर यांनी वापरली. कारकुन, व्यवस्थापन विषयक आणि प्रशासन विषयक काम करणा-या सर्वांना ही संज्ञा लागू करण्यात आली. अमेरिका, युके, कॅनडा आदी विकसित राष्ट्रांमध्ये ही संज्ञा आजही प्रतिष्ठित काम करणा-याकामगारांना किंवा करिअरमध्ये अत्यंत यशस्वी झालेल्या लोकांना लागू केली जाते.

ब्लू कॉलर ही संज्ञा सर्वप्रथम 1924 मध्ये वापरली गेली. कष्टाची कामे करणा-या कामगारांना किंवा रोजंदारीवर काम करणा-या कामगारांना ही संज्ञा लागू होते. तर ग्रीन कॉलर ही संज्ञा पर्यावरणासंदर्भात काम करणा-या लोकांना लागू करण्यात येते. पर्यावरण चळवळीतील कार्यकर्ते, इकोफ्रेंडली आर्किटेक्ट्स, सौरऊर्जा पवनऊर्जा आदींबाबत काम करणारे अभियंते आदींचा यात समावेश होतो.

 

तर पिंक कॉलर ही संज्ञा सेवाक्षेत्रातील  कर्मचा-याना लागू होते. पिंक कॉलर ही संज्ञा 1990 च्या अखेरीस उदयाला आली. सुरूवातीला ही संज्ञा केवळ महिला कामगारांसाठीच मयादित होती, मात्र आता या संज्ञेत सेवा क्षेत्रातील सर्व कर्मचारी समाविष्ट करण्यात आले आहेत.

याशिवाय, अत्यंत महत्त्वपूर्ण कामं करणा-या आणि प्रचंड मागणी असणा-या कामगारांकरीता गोल्ड कॉलर ही संज्ञा प्रचलित आहे. यामध्ये शल्यचिकीत्सक, अभियंते, भूलतज्ज्ञ, सीए, वकील आदींचा समावेश होतो.
आणखीही काही कॉलर्सचे रंग आणि त्यावरून कामगारांच्या कामाचं वर्गीकरण करण्यात आलं आहे.
 

1) रेड कॉलर - सरकारी खात्यातील कर्मचारी. आणि चीनमध्ये रेड कॉलर्ड म्हणजे कम्युनिस्ट पक्षाचे खाजगी कंपन्यांमधील कर्मचारी असाही संदर्भ आहे.

2) ग्रे कॉलर - कुशल तांत्रिक कामगार, आयटी क्षेत्रातील कर्मचारी, तंत्रज्ञानासंदर्भात काम करणारे कर्मचारी. शिवाय, निवृत्त झालेले वृद्ध कर्मचारीही ग्रे कॉलर म्हणून ओळखले जातात.

3) नो कॉलर - कलाकार आणि स्वच्छंदी जीवन जगत अर्थार्जन करणा-या लोकांसाठी ही संज्ञा वापरली गेली. ही संज्ञा सर्वप्रथम ‘सर्व्हायव्हर- वर्ल्डस अपार्ट’ या रिआॅलटी गेम शोमध्ये वापरली गेली. जे लोक काम करतात मात्र केवळ पैशासाठी काम करत नाहीत अशांना ही संज्ञा वापरण्यात आली होती.

4) आॅरेंज कॉलर - कारागृहातील कामगारांसाठी ही संज्ञा वापरतात.

5) स्कार्लेट कॉलर - सेक्स इंडस्ट्रीत काम करणा-यासाठी ही संज्ञा आहे.

6) ब्लॅक कॉलर - इंडस्ट्रीजमध्ये प्रत्यक्ष कष्टाची कामं करणारे कर्मचारी, जे नेहेमी धूळ, आॅइल ड्रीलींग वगैरे संदर्भात काम करतात अशांसाठी ही संज्ञा वापरली जाते. त्याचबरोबर, गैरव्यवहारात अडकलेल्यांसाठीही ही संज्ञा आहे.

7) व्हर्च्युअल कॉलर - मानवी कामे करणा-या रोबोट्ससाठी ही संज्ञा वापरली जाते.

एकंदरीतच कॉलरशी निगडित ही माहिती खरोखरीच रंजक आहे. फॅशन आणि समाजातील विविध स्तर यांचा संदर्भ अशा अनोख्या पद्धतीने लावून सामाजिक वर्गीकरणाची एक सुलभ वाट या वर्गीकरणामुळे अस्तित्त्वात आली. आजही बाकीच्या संज्ञा प्रचिलत नसल्यात तरी व्हाइट कॉलर्ड ही संज्ञा प्रचंड लोकप्रिय आहे.
फॅशन जगतातील लहानसहान बदलही खूप मोठा अर्थ सांगून जातात आणि काळाच्या पडद्यावर आपला शिक्का उमटवतात तो असा असंच म्हणावं लागेल!

 

 

Web Title: collars colour say manythings. Very intresting history behind this!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.