रंग जो लाउड है!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2017 05:06 PM2017-04-03T17:06:09+5:302017-04-03T17:06:09+5:30

एक काळ होता की लग्न किंवा पार्टी असली तरच घरातून लिपस्टिक लावायला परमिशन मिळायची. बरं त्या लिपस्टिकमध्येही मोजकेच कलर्स होते. त्यामुळे चॉइसला काही वाव फारसा नसायचाच.

Color which is Loud! | रंग जो लाउड है!

रंग जो लाउड है!

Next

 भक्ती सोमण

 
 
एक काळ होता की लग्न किंवा पार्टी असली तरच घरातून लिपस्टिक लावायला परमिशन मिळायची. बरं त्या लिपस्टिकमध्येही मोजकेच कलर्स होते. त्यामुळे चॉइसला काही वाव फारसा नसायचाच. 
मात्र काळ बदलला. मुलींना अप टू डेट रहायला लागणं आवडायला लागलं. आॅफिस, कॉलेजला जाताना थोडी फॅशन करून जाणंही महत्त्वाचं ठरू लागलं. त्यात लिपस्टिकही आता रोज लावण्याकडे मुलींचा कल वाढायला लागला आहे. आपल्याला कोणता कलर सूट होईल हे तर आता पाहिलं जातंच पण, हटके काहीतरी करण्याकडेही कल वाढला आहे. म्हणूनच तर मध्यंतरी ऐश्वर्याने कान्स फेस्टिव्हलमध्ये लावलेली निळ्या रंगाची लिपस्टिक एकदम अपील झाली. त्यावर भरपूर चर्चाही झाली; मात्र तरीही वेगळेपणा म्हणून मुलींना ती लिपस्टिक मात्र भरपूर आवडली. ऐश्वर्याच्या पावलावर पाऊल ठेवत काजोलनेही गेल्यावर्षी एका पुरस्कार सोहळ्यात जांभळ्या रंगाची लिपस्टिक लावत लक्ष वेधून घेतले. प्रथमदर्शनी हे काय काहीही लावलंय असा नकारात्मक सूर जरी असला तरी अशा गडद रंगाच्या लिपस्टिक आजच्या तरुणींनी आपल्याशा केल्या आहेत. यात मॅट कलर्सनाही पसंती मिळते आहे.
प्रत्येक इव्हेंटसाठी कोणती लिपस्टिक वापरायची याचं ज्ञान आता मुलींना चांगलं असतं. ते आॅनलाइनही मिळतं आणि इतर मैत्रिणींकडूनही. म्हणून एकच लिपस्टिक सगळीकडे असं आता होत नाही. त्या लिपस्टिक निवडीबाबत चोखंदळ असतात. इतर सौंदर्य प्रसाधनांबरोबर लिपस्टिकमध्येही त्यांना प्रयोग करायला आवडायला लागले आहेत, असं सौंदर्यतज्ज्ञ शलाका पंतमिराशी सांगते. लग्नासाठी, पार्टीसाठी कोणत्या लिपस्टिक वापरायच्या याकडेही आता मुली अगदी बारकाईने लक्ष देतात, त्यात रंगांचे प्रयोगही उत्तम करतात असं शलाका सांगते.
एवढं काय महत्त्व द्यायचं त्या लिपस्टिकला असं तुम्हाला वाटू शकतंच. पण हे फक्त लिपस्टिक लावणं नाही. ते एक स्टेटमेण्ट आहे. लाउड अ‍ॅण्ड क्लिअर. की जे मला छान दिसेल, आवडेल तेच मी बिनधास्त वापरणार! माझ्या जगण्यात कुणाला काय म्हणेल असं वाटून मी आवडते रंग टाळणार नाही.
 
मिक्स एण्ड मॅच
दोन लिपस्टिक एकत्र करून वापरण्यावर हल्ली भर दिला जात आहे. म्हणजे तुम्ही ब्राउन रंगाचा ड्रेस घातलाय म्हटल्यावर त्याच कलरची लिपस्टिक न लावता आधी बेबी पिंक कलरची लिपस्टिक लावून त्यावर ब्राउन कलरची लिपस्टिक लावून जो पिंकिश ब्राउन कलर येतो तोही उठावदार दिसतो. याशिवाय रेड-पिंक, आॅरेंज-पिंक, ब्राउन-पीच असे काही रंग मिक्स-मॅच करून वापरता येतात. 
 
गोल्डन कलर का मजा...
गोल्डन रंगाचा वापर लिपस्टिक म्हणून केला जात नसे. पण सध्या तरी उच्चभ्रू वर्गात या लिपस्टिकचा वापर अगदी सहज केला जात असल्याचे इन्स्टाग्रामच्या फोटोतून दिसते. पण या रंगाचा वापर करायला हळूहळू का होईना सुरुवात झाली आहे. तुमची लिपस्टिक कोणत्याही रंगाची असली तरी त्यावर गोल्डन लिपस्टिक लावल्याने ओठांना एक छान ग्लो येतो. ही लिपस्टिक कशा पद्धतीने वापरायची याची माहितीही आॅनलाइन वाचायला मिळते. ही लिपस्टिक लाल, जांभळा, मरून, गुलाबी अशा रंगाच्या लिपस्टिक्सवर वापरता येते. मुख्यत: डार्क कलरच्या लिपस्टिकवर त्याची शाइन जास्त उठून दिसते. त्यामुळे अशा लिपस्टिक आता सर्रास विकल्या जात आहेत. 
 
लाल, ऑरेंज रंग लोकप्रियच
लाल रंगाची लिपस्टिक एकेकाळी फार क्रेझ नव्हती. पण अनेक अभिनेत्री ती लिपस्टिक लावून स्वत:ला छान कॅरी करतात. म्हणून आता मुलीही तशा लिपस्टिक लावायला लागल्या आहेत. सध्या या लाल रंगाबरोबरच आॅरेंज, ब्राउन, डार्क ब्राउन, पीच असे गडद रंगही वापरले जातात. 
 
मॅट कलर
मॅट कलरचाही वापर सध्या वाढला आहे. यात रेड, पिंक, पर्पल, आॅरेंज असे कमी जास्त भडक रंगाच्या शेड्स सध्या मुलींना आवडतो आहे. त्यात विविड मेट्सच्या शेड्सची जास्त चलती आहे. रोज न वापरल्या जाणाऱ्या या मॅट लिपस्टिक कधीतरी हमखास वापरल्या जातात. तसेच फॅशन जगतातही या लिपस्टिकची चलती आहे. 
 
अ‍ॅप्सचा वापर
सध्या ब्यूटिविषयक माहिती देणाऱ्या अनेक अ‍ॅप्समधून लिपस्टिकची माहिती, ती कशी वापरायची, तुम्हाला ती छान दिसेल का अशी सगळेच मिळते. या अ‍ॅपमध्ये लेटेस्ट ट्रेंड्समध्ये सध्या हिरव्या, निळ्या, गोल्डन, लाल अशा रंगांना जास्त लाइक्स आहेत. शिवाय दोन रंग कसे एकत्र करू शकता याचेही मार्गदर्शन ब्यूटी एक्सपर्ट त्यातून देत असतात. त्यांना फॉलो करण्यापासूून त्यांना टिप्सही येथे विचारल्या जातात.
 
फेमस लिपस्टिक कलर्स 
१) सॅटिन वाइन  (Satine wine)
२) रेड आणि मरून  (Red and maroon)
३) ब्राइट ऑरेंज  (Bright orange)
४) कोरल पीच (Coral peach)
५) मेटालिक पर्पल (Mettallic purple)
६) पॅले पिंक ( Pale pink)
७) न्यूड (Nude)
८) मेट रेड (Matte red)
 
(भक्ती लोकमतच्या मुंबई आवृत्तीत उपसंपादक आहे.) 

Web Title: Color which is Loud!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.