चला... मोरांच्या गावाला जाऊया !

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2016 04:30 PM2016-12-25T16:30:32+5:302016-12-25T18:05:38+5:30

पुणे-नगर रस्त्यावर शिरुर, शिक्रापूर जवळ ‘मोराची चिंचोली’ हे नावाप्रमाणेच हिरवळीने पसरलेले आणि भरपूर मोर असलेले गाव आहे. अष्टविनायकापैकी एक असलेल्या रांजणगाव गणपतीपासून साधारण २३ किलोमीटर अंतरावर असलेल्या या गावात एक दिवसाची सहल उत्तम होऊ शकते.

Come on ... go to the village of peacocks! | चला... मोरांच्या गावाला जाऊया !

चला... मोरांच्या गावाला जाऊया !

Next
णे-नगर रस्त्यावर शिरुर, शिक्रापूर जवळ ‘मोराची चिंचोली’ हे नावाप्रमाणेच हिरवळीने पसरलेले आणि भरपूर मोर असलेले गाव आहे. अष्टविनायकापैकी एक असलेल्या रांजणगाव गणपतीपासून साधारण २३ किलोमीटर अंतरावर असलेल्या या गावात एक दिवसाची सहल उत्तम होऊ शकते. 
या छोट्याशा गावात खूप मोर आहेत. येथील लहान मुलांना, येथे राहणाऱ्या नागरिकांना मोर जणू आपल्या कुटुंबातलेच एक सदस्य असल्याप्रमाणे वाटतात. इथल्या गावकऱ्याची सकाळ ही मोरांच्या सुमधूर आवाजाने होती. या मोरांचा परिसर पंचक्रोशीत दूरपर्यंत आहे. शेजारच्या गावात सुद्धा कधी-कधी हे मोर आढळतात. अशा प्रकारे येथे आल्यावर निसर्गाचा अगदी जवळून आनंद लुटता येतो.
महाराष्ट्र शासनाने या गावाला पर्यटनाचा दर्जा दिलेला असून, येथे राहणारे नागरिक या मोरांविषयी खूप जागरुक आहेत. याठिकाणी गावात मोर बिनधास्त वावरतात. इथे त्यांच्यासाठी आंब्याच्या बागा आहेत. शिवाय ते तिथे असलेल्या शेतातसुद्धा चरायला जातात. 
सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यात वाटचाल करताना एक दिवस थांबून इथल्या निसर्गाचा आणि या मोरांचा अनुभव एक वेगळा आनंद नक्कीच देईल.

 

Web Title: Come on ... go to the village of peacocks!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.