आता टोपी-मफरल विसरा, हिवाळ्यात नाक गरम ठेवण्यासाठी आली नवी फॅशन!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2018 02:47 PM2018-10-17T14:47:25+5:302018-10-17T14:50:53+5:30
आता लवकरच हिवाळ्याला सुरुवात होणार आहे. काही दिवसांनी लोक जॅकेट, स्वेटर, मफलर आणि वेगवेगळ्या प्रकारच्या टोप्या वापरताना दिसतील.
आता लवकरच हिवाळ्याला सुरुवात होणार आहे. काही दिवसांनी लोक जॅकेट, स्वेटर, मफलर आणि वेगवेगळ्या प्रकारच्या टोप्या वापरताना दिसतील. पण सध्या बाजारात खास हिवाळ्यासाठी आलेली एक वस्तू फारच चर्चेचा विषय ठरत आहे. या प्रॉडक्टला 'नोज वॉर्मर' असं म्हटलं जात आहे. म्हणजे हे नोज वार्मर थंडीत नाक झाकण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.
हे प्रॉडक्ट तयार करणारी कंपनी Nosewarmers च्या फाऊंडर सॅली स्टील-जोन्स म्हणाल्या की, त्यांना हे नोज वार्मर तयार करण्याची आयडिया २००९ मध्ये आली होती. पण नाकाच्या या अनोख्या टोपीचा वापर जास्तीत जास्त लोक घराच्या आतच करतात.
Thank you @yorkshirepost@UKTINews for this feature today! https://t.co/rrad35eA1B
— Nose Warmer (@nosewarmer) March 9, 2017
जेव्हा सॅलीने कंपनीची सुरुवात केली होती तेव्हा तिच्या जास्त व्हेरायटी नव्हती. पण आता कंपनी वेगवेगळ्या प्रकारचे नोज वार्मर विकत आहे. याचे डिझाइन इतके आकर्षक आहेत की, लोक आता हे घालून रस्त्यावरही फिरु लागले आहेत.
हे प्रॉडक्ट तुम्ही जगातल्या कोणत्याही कोपऱ्यातून मागवू शकता. ज्यासाठी तुम्हाला ३ पाऊंड, भारतीय करन्सीमध्ये २९० रुपये द्यावे लागतील. चला तर मग वाट कशाची बघताय? हिवाळ्यात थंडीला दूर ठेवण्यासाठी खरेदी करा नोज वार्मर...