असे रहा पार्टीत ‘कंफर्टेबल’!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2016 05:32 PM2016-12-04T17:32:08+5:302016-12-04T17:32:08+5:30

बऱ्याचदा आपण मोठ्या उत्साहात पार्टीत जातो. मात्र आपण परिधान केलेल्या कपड्यांमुळे खूप अवघडल्यासारखे वाटते. यामुळे आपले सर्व लक्ष स्वत:वरच केंद्रीत होते आणि पार्टीतल्या आनंदाला मुकतो.

Conflictable in the party! | असे रहा पार्टीत ‘कंफर्टेबल’!

असे रहा पार्टीत ‘कंफर्टेबल’!

Next
्याचदा आपण मोठ्या उत्साहात पार्टीत जातो. मात्र आपण परिधान केलेल्या कपड्यांमुळे खूप अवघडल्यासारखे वाटते. यामुळे आपले सर्व लक्ष स्वत:वरच केंद्रीत होते आणि पार्टीतल्या आनंदाला मुकतो. याचाच अर्थ, आपली पार्टीसाठी योग्य ड्रेसची निवड करण्यात चूक झाली. खाली काही टिप्स दिल्या असून, त्या आधारे आपण कंफर्टेबल राहून पार्टीचा मनसोक्त आनंद लुटू शकता. 
बहुतेक पार्ट्या रात्रीच असतात. जर आपण रात्री उशिरापर्यंत नाईटआऊट करणार असल्यास हाय हिल्स सॅँडल अजिबात वापरु नका. कारण अशा वेळी खूप चालणे होते. यामुळे फ्लॅट चप्पलचा पर्याय चांगला आहे.
पार्टीत बॉडी हँगिंग गाऊन घालू शकता, जो की तुम्हाला ग्लॅमरस लूक देईल. मात्र लांब आणि मोठा ड्रेस वापरू नका. पार्टीदरम्यान तो कोठेतरी अडकून खराब होण्याची किंवा कोणी पाय देऊन तो घाण करण्याची शक्यता असते. तसेच सैलसर आणि फॅशनेबल कपडे वापरा. घट्ट कपडे परिधान करू नका. घट्ट ड्रेस घातल्याने तुम्हाला श्वास घेण्यात आणि चालण्यातही त्रास होईल. डेनिम आणि टॉपही तुम्हाला रिच पार्टी लूक देतात. पर्स जास्त मोठी आणि वजनदार घेऊ नका. पार्टीदरम्यान सांभाळायला ती खूप त्रासदायक होते.तुमच्या आउटफिटवर सूट होणारी अशी लहान पर्स निवडा.

Web Title: Conflictable in the party!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.