​COOL DESTINATION : उन्हाळ्यात ‘कूल’ होण्यासाठी या ठिकाणांना द्या भेटी !

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2017 01:05 PM2017-02-18T13:05:06+5:302017-02-18T18:35:06+5:30

उन्हाळ्यात कूल होण्यासाठी बहुतेकजण हिमालयातील मनाली, डलहौजी, नैनीताल यांसारख्या हिल स्टेशनवर गर्दी करतात. त्यामुळे तिथे शांतता मिळत नाही. त्याऐवजी असे काही ठिकाणे आहेत जे कूलही आहेत आणि शांततामयदेखील आहेत.

COOL DESTINATION: Giving these places to be 'Cool' in the summer! | ​COOL DESTINATION : उन्हाळ्यात ‘कूल’ होण्यासाठी या ठिकाणांना द्या भेटी !

​COOL DESTINATION : उन्हाळ्यात ‘कूल’ होण्यासाठी या ठिकाणांना द्या भेटी !

googlenewsNext
ong>-Ravindra More

नुकताच उन्हाळा सुरु झाला असून गरम हवेने बरेचजण त्रस्त होताना दिसत आहेत. उन्हाळ्यात कूल होण्यासाठी बहुतेकजण हिमालयातील मनाली, डलहौजी, नैनीताल यांसारख्या हिल स्टेशनवर गर्दी करतात. त्यामुळे तिथे शांतता मिळत नाही. त्याऐवजी असे काही ठिकाणे आहेत जे कूलही आहेत आणि शांततामयदेखील आहेत. चला मग या उन्हाळ्यात या ठिकाणांची सवारी करून कूल होऊया. 



* पंचमढी 
मध्यप्रदेश आणि परिसरातील राज्यातील लोकांना आकर्षणाचा केंद्रबिंदू म्हणजे पंचमधी. सातपुडा पर्वतावर वसलेल्या या पंचमढीच्या धूपगढ किल्लयाच्या टोकावर सुर्य किरणे सर्वात अगोदर पडतात. शिवाय येथे बी-फॉल, पांडव गुहा, पहाडावर वसलेले चौरागढ शिव मंदिरसोबतच अनेक दर्शनीय स्थळे आहेत. येथे उन्हाळ्यात मप्रच्या इतर भागांच्या तुलनेत गार हवा असते.



* तामिया-पातालकोट
तामिया पंचमढीपासून तीन तासांच्या अंतरावर मप्रच्या सातपुडा पर्वतावर आहे. तामियापासून काही अंतरावरच पातालकोट आहे. हे ठिकाण सकाळ-संध्याकाळ गार असते. पातालकोट हे जमीनीपासून १७०० फूट खाली वसले असून खूपच रहस्यमय आहे. याठिकाणी तीन-चार व्यू पॉइंट आणि महादेवाचे मंदिर आहे. तामियाच्या आजुबाजूला अनेक डोंगरांवर उभारलेले गेस्टहाउस आणि हॉटेल्समुळे सौंदर्यात अजूनच भर पडते. 



* कुन्नूर
याठिकाणी कुरिनजी फूले मिळत असल्याने याचे नाव कुन्नूर पडले असून तामिळनाडूमध्ये निलगिरी पर्वतावर वसले आहे. या ठिकाणी असलेल्या हॅरीटेज ट्रेन, टायगर हिल सीमेट्री, डूग फोर्टवर पर्यटक रिलॅक्स होऊ शकतात.



* अंदमान अँड निकोबार
अंदमान आणि निकोबार हे ठिकाण निसर्गाच्या सौंदर्याने परिपूर्ण असून समुद्राने घेरलेले असल्याने पर्टकांसाठी एक विलोभनीय ठिकाण आहे. याठिकाणी अंदमान आयलँड, नील आयलँड, ग्रेट निकोबार आयलँडसोबतच अनेक आकर्षक ठिकाणे आहेत.



* माथेरान
मुंबईपासून अवघ्या ११० किमी अंतरावर माथेरान हे हिल स्टेशन असून गाड्या-मोटारला प्रतिबंध असलेले माथेरान हे आशियातील एकमेव हिलस्टेशन आहे. ज्यामुळे येथील हवा शुध्द आहे. येथे अलेस्जेंडर पॉइंट, वन ट्री हिल, इको पॉइंट यांसारखे अनेक दर्शनीय स्थळे आहेत.



* पाचगनी
महाराष्ट्रातील पाचगनी हे अतिशय प्रसिद्ध हिल स्टेशन असून हे ठिकाण पाच पर्वतांनी घेरलेले आहे. शिवाय येथून कृष्णा नदी वाहत असून कमळगढ, प्रतापगढ किल्ला, टेबल लँड, सिडनी पॉइंटसोबतच ब्रिटिश आणि पारसी स्टाइलमध्ये बनलेले खूप सुंदर आहेत. 



* गंगटोक 
या ठिकाणी चोलामू पासून हनुमान टोक, कंचनजंघा नॅशनल पार्क हे टूरिस्ट स्पॉट असून सिक्कीमची राजधानी आहे. याठिकाणचा नाइट व्यू पर्यटकामध्ये खास लोकप्रिय आहे. 



* पन्हाळा
या ठिकाणी पन्हाळा किल्ला असून सोबतच पाराशर गुफा, महालक्ष्मी मंदिर, सनसेट आणि नसराइज पॉइंट दर्शनीय आहे. महाराष्ट्रमधील कोल्हापुरात पन्हाळा हे हिल स्टेशन अधिकच लोकप्रिय आहे. 

Web Title: COOL DESTINATION: Giving these places to be 'Cool' in the summer!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.