​फॅशनेबल कपड्यांची महिला व तरुणीमध्ये क्रेझ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2016 03:58 PM2016-07-09T15:58:55+5:302016-07-09T21:28:55+5:30

तरुणींमध्ये जम्प सूट, बॉक्स प्लेटस स्क र्ट तर महिलांमध्ये प्लोवर लेंग्थची क्रेझ आहे

Crazy in fashionable clothes woman and woman | ​फॅशनेबल कपड्यांची महिला व तरुणीमध्ये क्रेझ

​फॅशनेबल कपड्यांची महिला व तरुणीमध्ये क्रेझ

googlenewsNext

/>
फॅशनेबल राहणे आजकाल हे सर्वानाच आवडत आहे. त्यामुळे अलीकडे फॅशनेबल कपड्यांचाच ट्रेण्ड नेहमी  पाहायला मिळतो. सिनेमात सेलिब्रिटीने परिधान केलेल्या कपडेच  आपल्याकडे फॅशन म्हणून येतात. सध्या तरुणींमध्ये जम्प सूट, बॉक्स प्लेटस स्क र्ट तर महिलांमध्ये प्लोवर लेंग्थची क्रेझ आहे. तरुणीमध्ये फॅशन असलेला हा प्रकार सेलिब्रेटीने विविध चित्रपटात परिधान केलेला आहे. 
पूर्वी तरुणी  दबावामुळे किंवा अन्य कारणामुळे फॅशनेबल राहत नव्हत्या. परंतु, अलीकडे उच्च शिक्षण घेऊन करिअरचा निर्णय त्या स्वत: घेत आहेत. त्यांना  यासाठी घरातूनही प्रोत्साहन मिळत आहे. स्वातंत्र्यामुळे    फॅशनेबल राहण्यासाठीही त्या कचरत अलीकडे अजिबात कचरत नाही. बाजारात स्टाईलीस्ट कपड्यांना तरुणी पहिली पसंती दर्शवितात. 

जम्प सूट : सध्या तरुणीमध्ये म्हटले तर जम्प सूट हा सर्वात आवडता प्रकार आहे. यामध्ये लॉग व शॉर्टची के्रझ जास्त आहे. तसेच हा प्रकार
कर्न्फेटेबलही आहे. आॅफिस, पार्टी असा कुठेही तो यूज करता येतो. कॉलेज जाणाºया तरुणीमध्ये तर हाच प्रकार मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो. मागील वर्षभरापासून फॅशनमध्ये विक्रेत्यांकडे जम्प सूटलाच अधिक पसंती मिळत आहे. बºयाच सिनेमात काही नटानी हा सूट परिधान केलेला आहे. फॅशन म्हणूनही पहिली पसंती जम्स सूटलाच राहते.  त्यामुळे तो तरुणींच्या पसंतीला उतरत आहे. 

बॉक्स प्लेट्स स्कर्ट : हल्लीच्या तरुणीमध्ये फॅशनेबल बॉक्स प्लेट्स स्क र्टचा सुद्धा ट्रेंण्ड सुरु आहे. यामध्ये लॉग व शॉर्ट असे दोन्हीही प्रकार असल्याने तरुणींना ते अधिकच पसंतीला उतरत आहे.यामधील क्राप टॉप हा प्रकार सध्या फारच जोरात सुरु आहे. कॉलेजात होणाºया सांस्कृतिक कार्यक्रमासाठी सर्वार्धिक बॉक्स प्लेटस स्क र्टलाच पसंती मिळते. 
महिलांसाठी प्लोअर लेंग्थ : महिलांमध्ये फॅशन म्हणून प्लोअर लेंग्थ हा प्रकार सध्या मोठ्या प्रमाणात आहे. यामध्ये लेन्सचे टॉप, प्लाझो आदी प्रकार आहेत. यामध्ये सर्वार्धिक महिलांची पसंती ही कुर्तीजला असल्याचे चित्र  आहे. 

फॅशनेबलाच मागणी
महिला तरुणींची सध्याला फॅशनेबललाच अधिक पसंती असल्याचे चित्र आहे. वेगवेगळ्या पॅटर्नच्या साड्या व फॅ शनेबलला पसंती मिळत आहे. तरुणींचा सुद्धा फॅशनेबल वाटणाºया ड्रेसकडेच ओढा आहे. सध्या सुरु असलेली फॅशनवर  बॉलीवूडचा मोठ्या प्रभाव असल्याचे दिसून येत आहे. तसेच कपड््याबरोबरच फॅशनेबल पर्स, बॅगल्स आदी वस्तूनाही मागणी अधिक आहे. 

दिलवाले मध्ये जम्प सूट



२३ डिसेंबर २०१५ ला  रिलीज झालेला दिलवाले या चित्रपटात काजोलने जम्प सूट परिधान केलेला आहे. तेव्हापासूनच तरुणींमध्ये जम्प सूटची क्रेझ ही मोठ्या प्रमाणात आली आहे. या चित्रपटात शाहरुख खान, वरुन धवन आदींचा समावेश आहे. तसेच अन्य हिंदी सिनेमातही अनेक नट्या या सूटवर पाहायला मिळतात. 

Web Title: Crazy in fashionable clothes woman and woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.