द. कोरियामध्ये ३-डी फिगरचे वेड
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2016 11:34 AM2016-08-07T11:34:26+5:302016-08-07T17:04:26+5:30
फोटोंच्या माध्यमातून ज्याप्रकारे तो क्षण आपण कायमचा कैद करून ठेवतो, ३-डी फिगर त्याचेच पुढचे पाऊल आहे.
Next
स पूर्ण जगात सेल्फीची क्रेझ असताना द. कोरियातील लोकांना मात्र वेगळेच वेड लागले आहे. कॅमेर्यात फोटो काढून ते डिजिटली सेव्ह करणे किंवा प्रिंट करणे त्यांच्यासाठी मागासलेली बाब आहे. त्याऐवजी ते स्वत:ची, बाळाची आणि पाळीव प्राण्यांची त्रिमितीय (३-डी) फिगर बनवून घेणे पसंत करतात.
‘आयओयज्’ नावाच्या ३-डी फिगर प्रिंटिंग कंपनीने असे त्रिमितीय आकार प्रिंट करते. अनेक लोक आपल्या लहान मुलांची ३-डी आकृती बनवून घेण्यासाठी त्यांच्याकडे येतात. फोटोंच्या माध्यमातून ज्याप्रकारे तो क्षण आपण कायमचा कैद करून ठेवतो, ३-डी फिगर त्याचेच पुढचे पाऊल आहे.
त्यासाठी एका खांबाच्या आकाराच्या बूथमध्ये उभे राहावे लागते. मग शंभर कॅमेरे सर्व अँगल्सने २-डी फोटो काढतात. मग सेऊल येथे असणार्या कारखान्यात फिगर बनविणार्या मशीनसाठी याफोटोंच्या आधारावर ब्लूप्रिंट बनविली जाते. ही मशीन ५ सेंमी (दोन इंच) ते ३० सेंमी (१२ इंच) आकाराच्या फिगर्स बनवते. त्यासाठी सुमारे सहा हजार खर्च रुपये येतो. यापेक्षा तिप्पट पैसेदेखील लागू शकतात.
‘आयओयज्’ची सहायक व्यवस्थापक ली सि-चीओन सांगतात की, कित्येक लोक आमच्याकडे त्यांचे बाळ, पाळीव प्राणी, कुटुंबासह येतात. काही प्रेमी जोडपेसुद्धा येतात.