वेडींग सीझनसाठी दीपिकाचा क्लासी लूक ट्राय करा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2018 15:30 IST2018-12-11T15:28:53+5:302018-12-11T15:30:30+5:30
बॉलिवूडची मस्तानी दीपिका पादूकोन प्रत्येक इव्हेंटमध्ये आपल्या हटके आणि ग्लॅमर्स लूकने चाहत्यांना नेहमीच घायाळ करते. काही दिवसांपूर्वीच पार पडलेल्या ईशा अंबानीच्या प्री-वेडींग पार्टीमध्ये दीपिकावरच सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या.

वेडींग सीझनसाठी दीपिकाचा क्लासी लूक ट्राय करा!
बॉलिवूडची मस्तानी दीपिका पादूकोन प्रत्येक इव्हेंटमध्ये आपल्या हटके आणि ग्लॅमर्स लूकने चाहत्यांना नेहमीच घायाळ करते. काही दिवसांपूर्वीच पार पडलेल्या ईशा अंबानीच्या प्री-वेडींग पार्टीमध्ये दीपिकावरच सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या. दीपिकाने केलेला लूक ट्रेडिशनल असण्यासोबतच फार हॉट दिसत होता. वेडींग सीझनमध्ये तुम्हीही हा लूक कॉपी करू शकता.
दीपिकाने फाबीअनाची लाल रंगाची साडी वेअर केली असून तिने सेक्सी हॉल्टर ब्लाउजसोबत मॅच केली होती. साडीची हायलाइट आणि तिचा सुंदर पल्लू प्लीट्स डिझाइनमध्ये होता. या डिझाइनमुळे दीपिकाची सिम्पलशी साडीही हटके दिसत होती.
ज्वेलरीसाठी दीपिकाने गोल्डन लेयर्ड नेकलेस निवडला होता. ज्यामध्ये स्टोन्स जडवण्यात आले होते. यासोबतच मॅचिंग इयरिंग्जही होते. हा नेकलेस साडी साडीवर शाइन करत होता आणि लॉन्ग नेक असणाऱ्या दीपिकावर शोभून दिसत होता. या इव्हेंटसाठी तिला शालीनी नथानीने तयार केलं होतं.
मेकअपबाबत सांगायचं झालचं तर या साडीच्या लूकसोबत दीपिका आपल्या फेवरेट आयलायनर लूक कॅरी करताना दिसली होती. हेयरस्टाइल सिम्पल ठेवून तिने फक्त पोनीटेल लूक कॅरी केला होता. फक्त यावेळी स्लीक स्टाइल पोनी ऐवजी मेस्सी लूक पोनी टेल लूक केला होता.
दीपिकाच्या या सिंपल पण गॉर्जियस लूकला तुम्हीही अगदी सोप्या पद्धतीने कॉपी करू शकता. खास गोष्ट म्हणजे साडीपासून ज्वेलरीपर्यंत अगदी सहज मार्केटमध्ये उपलब्ध होईल. तुम्ही एखादी सिंपल साडी घेऊन तिच्या पल्लूला दीपिकाच्या साडीप्रमाणे लूक देऊ शकता.