दीपिका, सोनमसह 'या' अभिनेत्रीही आहेत पिंक कलरसाठी क्रेझी!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2019 07:03 PM2019-01-23T19:03:33+5:302019-01-23T19:03:43+5:30
बॉलिवूड सेलिब्रिटी आपला लूक आणि आउटफिट्ससाठी नेहमीच कॉन्शिअस असतात. परंतु कलरबाबत यांच्यामध्ये एक वेगळचं क्रेझ पाहायला मिळते.
बॉलिवूडसेलिब्रिटी आपला लूक आणि आउटफिट्ससाठी नेहमीच कॉन्शिअस असतात. परंतु कलरबाबत यांच्यामध्ये एक वेगळचं क्रेझ पाहायला मिळते. सोनम कपूर, दीपिका पादुकोण, अनुष्का शर्मा किंवा अलिया भट्ट यांच्या फॅशन सेन्सची चाहत्यांमध्ये नेहमीच चर्चा होताना दिसून येते. सध्या या बॉलिवूड दिवाज पिंक कलरसाठी असलेल्या आपल्या क्रेझबाबत चर्चेमध्ये आहे. एखादा इव्हेंट असो किंवा एअरपोर्ट लूक. त्या नेहमीच आपल्या आउटफिट्सबाबत कॉन्शिअस असतात.
सोनम कपूर काही दिवसांपूर्वी ब्रँड अॅम्बेसिडर असलेल्या एका नामांकित घडाळाच्या कंपनीच्या इव्हेंटमध्ये सहभागी झाली होती. ज्यासाठी तिने Calvin Klein चा पिंक शेडचा फॉर्मल सूट वेअर केला होता. यामध्ये ती फार स्टायलिश दिसत होती.
याच इव्हेंटमध्ये सोनमने Mark Bumgarner चा लाइट पिंक शेडचा ऑफ शोल्डर गाउन वेअर केला होता. यामध्ये ती एखाद्या राजकुमारीप्रमाणे दिसत होती.
सोनमप्रमाणेच दीपिकाही पिंक कलरबाबतचा क्रेझ लपवू शकली नाही. 71व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलपासून इतरही अनेक पब्लिक इव्हेंट्समध्ये तिला पिंक कलरच्या आउटफिट्मध्ये पाहण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वीच करण्यात आलेल्या फोटोशूटमध्ये दीपिकाने ऑफ-शोल्डर पिंक कलरचा शॉर्ट टॉप वेअर केला होता.
अनुष्काने आपल्या लग्नामध्ये जो लेहंगा परिधान केला होता तोही लाइट पिंक कलरचाच होता. लग्नानंतरही अनेक ठिकाणी अनुष्का पिंक शेडच्या आउटफिट्समध्ये दिसून आली होती.
नव्या वर्षाच्या निमित्ताने ज्यावेळी सिडनीच्या पंतप्रधानांनी तिला इनव्हाइट केलं होतं. त्यावेळीही अनुष्का पिंक कलरच्या अनारकलीमध्ये दिसून आली होती.
आलिया भट्टही या कलरसाठी क्रेझी असल्याचे पाहायला मिळाले. तीदेखील अनेकदा पिंक कलरच्या वेगवेगळ्या शेड्सच्या आउटफिट्समध्ये दिसून आली आहे.
अलिया अनेकदा पिंक आउटफिट्समध्ये दिसून येते. असाच एक पिंक आउटफिटमधील फोटो आलिया इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. त्यासाठी तिन 'वन पिंक डे' असं कॅप्शनही दिलं होतं.