डेस्टिनेशन वेडिंगची क्रेझ वाढतेय

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2016 01:17 AM2016-01-16T01:17:56+5:302016-02-07T07:17:38+5:30

लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा अन् आनंदाचा क्षण असतो. असा क्षण जो आयुष्यभरासाठी  आठवणीत राहावा यासाठी आजकाल जोडपी काहीतरी हटके करू पाहत आहेत

Destination Wedding Crowds Increasingly | डेस्टिनेशन वेडिंगची क्रेझ वाढतेय

डेस्टिनेशन वेडिंगची क्रेझ वाढतेय

Next
्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा अन् आनंदाचा क्षण असतो. असा क्षण जो आयुष्यभरासाठी आठवणीत राहावा यासाठी आजकाल जोडपी काहीतरी हटके करू पाहत आहेत. त्यामुळे सध्या डेस्टिनेशन वेडिंगची क्रेझ खूप वाढली आहे. केवळ जोडप्यालाच नाही तर उपस्थित सर्वच पाहुण्यांनाही डेस्टिनेशन वेडिंगमुळे एक यादगार अनुभव मिळतो. तुम्हालाही जर असेच अविस्मरणीय पद्धतीने लग्न करायचे असेल तर हे नक्की वाचा.. १. ऐतिहासिक स्मारके : स्थळ : माचू पिचू, अंगकोर वॅट
अतिशय भन्नाट तर्‍हेने लग्न करू पाहणार्‍यांसाठी माचू पिचू सारखे दुसरे ठिकाण नाही. हजारो वर्षांपासून अस्तित्वात असलेले हे भग्न अवशेष डेस्टिनेशन वेडिंगसाठी अतिशय स्वप्नवत आहेत.
माचू पिचू आणि अँडीज् पर्वत रांगा तुमच्या लग्नाचा दिवस अविस्मरणीय करतात. अंगकोर वॅट येथील मंदिर हे जगातील सर्वात मोठे धार्मिक स्मारक आहे. अशा ठिकाणी लग्न करणे म्हणजे 'ड्रीम कम ट्र' एक्सपेरिअन्स आहे. अप्सरा डान्सरच्या मनमोहक सादरीकरणाने लग्न समारंभाला चार चांद लागल्याशिवाय राहणार नाही.
२. पाण्याखाली लग्न : स्थळ : हवाई, बहामाज्
ऐकून थोडे विचित्र वाटेल मात्र महासागराच्या तळाशी लग्न करण्याची अनेक जणांची इच्छा असते. नेहमीपेक्षा एकदम वेगळ्या पद्धतीने लग्न करण्यासाठी अंडरवॉटर वेडिंग अल्टिमेट ऑप्शन आहे. बहामाज् येथील 'प्रीचा आयलँड' हे अशा तर्‍हेच्या लग्नांसाठी सर्वाची पहिली पसंती असते.
हवाईच्या ओपन ओशिएन सेंटर येथे तर काही साहसवीर जोडपे एकमेकांसह आयुष्यभर जगण्याचे वचन देऊन बिनधास्त पाण्यात उड्या मारतात. यासाठी खास ओपन ओशिएन एक्झीबीट हा ७५ गॅलन पाण्याचा हौद तयार करण्यात आला आहे.

Web Title: Destination Wedding Crowds Increasingly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.