Diwali 2018 : दिवाळीमध्ये ट्रेडिशनल लूकसाठी ट्राय करा 'या' ज्वेलरी; मिळवा बॉलिवूड अभिनेत्रींप्रमाणे लूक!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2018 04:20 PM2018-11-05T16:20:44+5:302018-11-05T16:26:49+5:30
ऑक्टोबर आणि नोव्हेंबर म्हटलं की, खूप साऱ्या सणांचा महिना. परंतु इतर सणांपेक्षा हा महिना ओळखला जातो तो म्हणजे दिवाळीसाठी. सगळीकडे मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी केली जाते. दिवाळीच्या प्रत्येक दिवसाला वेगवेगळे महत्त्व असते.
ऑक्टोबर आणि नोव्हेंबर म्हटलं की, खूप साऱ्या सणांचा महिना. परंतु इतर सणांपेक्षा हा महिना ओळखला जातो तो म्हणजे दिवाळीसाठी. सगळीकडे मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी केली जाते. दिवाळीच्या प्रत्येक दिवसाला वेगवेगळे महत्त्व असते. त्यातीलच एक धनतेरस. या दिवशी घरातील धनाची पूजा करण्यात येते.
दिवाळीसाठी जर तुम्ही सोन्याचे दागिने विकत घेण्याचा विचार करत असाल किंवा तुमचं बजेट फार कमी आहे आणि त्यामध्ये तुम्हाला बेटर ऑप्शन शोधत असाल तर तुम्ही बॉलिवूड सेलिब्रिटींकडून टिप्स घेऊ शकता.
ऐश्वर्या रायपासून ते दीपिका पादुकोणपर्यंत अनेक बॉलिवूड तारकांनी वेगवेगळ्या ज्वेलरी आपल्या चित्रपटांमध्ये वेअर केल्या आहेत. त्यांचा हा ज्वेलरी ट्रेन्ड इतका फेमस झाला की, मार्केटमध्ये त्यांच्या या ज्वेलरींची मागणी वाढली होती. त्याचप्रमाणे आर्टिफीशियल ज्वेलरी डिझाईन्सही मार्केटमध्ये अवेलेबल झाले होते. तुम्हीही दिवाळीसाठी या हटके ज्वेलरी खरेदी करू शकता.
जोधा अकबरमधील ऐश्वर्याचा राजपूत लूक
जोधा अकबर चित्रपट रिलिज झाल्यानंतर लोकांमध्ये राजपूत ज्वेलरीचा ट्रेन्ड प्रचंड गाजला होता. या चित्रपटामध्ये ऐश्वर्याने हेवी लूक ज्वेलरी वेअर केली होती. परंतु, या ज्वेलरीपैकी सर्वांचं लक्ष फक्त गळ्यासोबत असलेल्या चकोर सेटकडे आकर्षित झालं होतं. या सेटमध्ये तुम्हाला अनेक डिझाइन्स बाजारात उपलब्ध होतील.
प्रेम रतन धन पायोमधील सोनम कपूर
शाही खानदानातील राजकुमारी दाखवण्यात आलेली सोनम कपूरने या चित्रपटामध्ये हेवी ज्वेलरी लूक कॅरी केला आहे. परंतु, या ज्वेलरीचे डिझाइन ट्रेडिशनल असण्यासोबतच थोड्याशा मॉर्डन लूकमध्ये तयार करण्यात आले आहेत. या फोटोमध्ये वेअर करण्यात आलेला कुंदन सेट हेव्ही आहे पण ईअररिंग्ज लेटेस्ट डिझाइनचे आहेत. या दिवाळीसाठी तुम्ही ही ज्वेलरी डिझाइन नक्की ट्राय करू शकता.
बाजीराव मस्तानीमधील दीपिका पादुकोण
'पासा' हा मुस्लिम समाजातील महिलांचा ट्रेडिशनल दागिना असून तो बिंदीप्रमाणे डोक्यावर घालण्यात येतो. या चित्रपटात दीपिकाने वेअर केल्यानंतर अनेक महिलांमध्ये पासाची क्रेझ दिसून आली. बाजारात याच्या अनेक वरायटी उपलब्ध आहेत.
बाजीराव मस्तानीमधील प्रियांका चोप्रा
बाजारीव मस्तानीमध्ये बाजीरावच्या अर्धांगिनीची भूमिका प्रियांकाने साकारली आहे. मराठमोळी पण थोडीशी हटके डिझाइन्स प्रियांकाने वेअर केल्या होत्या ज्या अनेकांना आपली दखल घेण्यासाठी भाग पाडत होत्या. खासकरून प्रियांकाने नाकामध्ये घातलेली नथ आणि कानातील झुमके सर्वांचं लक्ष वेधून घेत होते. तुम्हालाही प्रियांकाचा हा लूक आवडला असेल तर तुम्हीही तिच्याप्रमाणे दिवाळीसाठी खास ज्वेलरी लूक ट्राय करू शकता.
पद्मावतमधील दीपिका पादूकोण
पद्मावत चित्रपटामध्ये राणी पद्मावतीच्या भूमिकेला साजेशा अशा दागिन्यांचा लूक दीपिकाने ट्राय केला होता. यामध्ये दीपिकाने परिधान केलेला चोकर सेट आणि झुमके सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. ट्रेडिशनल लूकसाठी ही ज्वेलरी तुम्ही वापरू शकता.