​चुकूनही ठेवू नका हे पासवर्ड !

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2017 02:34 PM2017-01-24T14:34:03+5:302017-01-24T20:04:03+5:30

बऱ्याचदा आपण अगदी सोपे पासवर्ड ठेवत असतो. आणि हॅकर्सला सहज हॅक करण्याची संधी मिळते.

Do not forget that password! | ​चुकूनही ठेवू नका हे पासवर्ड !

​चुकूनही ठेवू नका हे पासवर्ड !

Next
प्रत्येकाकडे मोबाईल, टॅबलेट, संगणक, लॅपटॉप आदी गॅजेट्स उपलब्ध आहेत. यांच्या सुरक्षितेसाठी आपण पासवर्ड ठेवतो. मात्र, बऱ्याचदा आपण अगदी सोपे पासवर्ड ठेवत असतो. आणि हॅकर्सला सहज हॅक करण्याची संधी मिळते. विशेषत: सोपे पासवर्ड आपण लवकर आठवायला हवा म्हणून आपण पासवर्ड ठेवताना असे लेटर्स आणि कॅरेक्टर्स वापरतो जे कीबोर्डवर सहज टाईप होतात. उदाहरणार्थ, १२३४५६७८ किंवा qwertyuiop इत्यादी. यामुळे आपल्याला पासवर्ड लक्षात ठेवणे सोपे ठरत असले तरी असे पासवर्ड हॅकर्स सहज हॅक करू शकतात. दरवर्षीप्रमाणे यावर्षी वापरल्या गेलेल्या खराब पासवर्डची यादी जाहीर झाली आहे. तुम्हीसुद्धा या दहापैकी पासवर्ड ठेवला असेल तर लगेच बदलवा. 

1. 123456
2. 123456789
3.  qwerty 
4. 12345678
5. 111111
6. 1234567890
7. 1234567
8. password
9. 123123
10. 987654321

Web Title: Do not forget that password!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.