फेसबुक लाईक्सला अतिमहत्त्व देऊ नका!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2016 01:51 PM2016-09-29T13:51:57+5:302016-09-29T19:21:57+5:30

ज्या लोकांना जगण्याचा हेतू ज्यांना माहित असतो ते लोक सोशल मीडियाचा फीडबॅक फार मनावर घेत नाही.

Do not give VIP to Facebook! | फेसबुक लाईक्सला अतिमहत्त्व देऊ नका!

फेसबुक लाईक्सला अतिमहत्त्व देऊ नका!

googlenewsNext
शल मीडियाचा असा काही उद्रेक झाला आहे की, त्याच्याशिवाय जगणं मुश्किल झाले आहे. पूर्वी बाहेर पडल्यावर आपल्याला किती लोक नमस्कार करताता यावरून ‘इज्जत’ ठरत असे तर आज काला फेसुकवर तुमच्या पोस्टला किती लाईक्स किंवा कमेंटस् येतात यावरून तुमची पत ओळखली जाते.

लाईक्स मिळवण्याचा अट्टहास एवढा कि त्यावरून लाईक न केल्यास हेवे-दुवे निर्माण होतात. या प्रवृत्तीचा अभ्यास करण्यासाठी अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठातील संशोधकांनी एक संशोधन प्रकल्प हाती घेतला होता. त्यातून समोर आलेले निष्कर्ष आपल्याला खूप काही शिकवणारे आहेत.

गटाचे प्रमुख अँथनी बरो यांनी माहिती दिली की, ज्या लोकांना आपल्या आयुष्याची दिशा माहित असते, जगण्याचा हेतू ज्यांना माहित असतो ते लोक सोशल मीडियाचा फीडबॅक फार मनावर घेत नाही. उलट जे लोक अशा प्रकारे सोशल मीडियाच्या शिक्कामोर्तबावर अति अवलंबून असतात त्यांना वेळोवेळी पश्चातापालाच सामोरे जावे लागते.

FB Likes

संशोधकांनी सोशल मीडियाचा वापर प्रमाणात आणि खेळीमेळीने करण्याचा सल्ला दिला. प्रोफाईल फोटो बदलल्यावर दर पाच मिनिटांनी किती लाईक्स आल्या हे तपासण्याची तुम्हाला सवय असेल तर ती तात्काळ बदलावी.

त्याऐवजी आपल्या मित्र-परिवारासोबत वेळ व्यतीत करा. समोरासमोर केलेले संभाषण आपल्या मनावरचा ताण हलका करते. विनाकारण नको त्या गोष्टींना आत्मसन्मानाशी जोडू नका. 

Web Title: Do not give VIP to Facebook!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.