दिवाळीनंतर अशी करा घराची साफसफाई
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2016 04:23 PM2016-10-29T16:23:46+5:302016-10-29T16:23:46+5:30
प्रकाश आणि फटाक्यांचा उत्सव दिवाळी, सर्वांनीच एन्जॉय केला असेलच. हा उत्सव धनत्रयोदशी पासून सुरू होतो. त्यानंतर लक्ष्मी पूजन केले जाते. सोबतच हिंदू नववर्ष म्हणजे पाडव्याने या उत्सवाचा समारोप होतो.
Next
प्रकाश आणि फटाक्यांचा उत्सव दिवाळी, सर्वांनीच एन्जॉय केला असेलच. हा उत्सव धनत्रयोदशी पासून सुरू होतो. त्यानंतर लक्ष्मी पूजन केले जाते. सोबतच हिंदू नववर्ष म्हणजे पाडव्याने या उत्सवाचा समारोप होतो. यादरम्यान आपण प्रत्येक दिवशी रांगोळी काढतो, रात्री लॉनवर फटाक्यांची आतषबाजी करतो, घरालादेखील दिव्यांनी आणि फुलांनी सजवतो. संपूर्ण वातावरणात उत्साह, आनंद संचारलेला असतो.
काय होते जेव्हा हा उत्सव संपतो? काही वेळापूर्वी आपल्या घराला नवीन आकर्षक लूक आलेला होता, त्याच घरात फरशीवर रांगोळी विखुरलेली पडलेली असेल, घराच्या अवतीभोवती फटाक्यांचे पेपर्स, प्लास्टिक व फ्लॅश पावडर, पूजा तसेच सजावटीसाठी वापरलेली फुले घरात इकडे-तिकडे पडलेले दिसतील. एवढेच नव्हे तर, दिवाळी संपल्यानंतर घरात मोठ्या प्रमाणात धूळ-मातीदेखील जमा झालेली असते. ज्याप्रमाणे दिवाळीच्या अगोदर घराची साफसफाई आणि सजावट महत्त्वाची असते, त्याचप्रमाणे दिवाळीनंतर देखील घराची साफसफाई महत्त्वाची आहे. आजच्या सदरात दिवाळीनंतरच्या साफसफाईबाबत जाणून घेऊया...
१. अनावयक वस्तूंना हटवा
शक्य तितक्या लवकर घराच्या सजावटीसाठी वापरण्यात आलेल्या वस्तूंना हटवा. त्यात दरवाजे आणि खिडक्यांवर लटकलेली कोरडी फुले लवकर काढून टाका. सोबतच रांगोळी ही फरशीवर इतरत्र पसरण्याअगोदर लगेच साफ करा.
२. किचन
किचनची साफसफाई सर्वात महत्त्वाची आहे. कारण दिवाळीनिमित्त बरेच खाद्यपदार्थ बनविण्यात येतात. किचनची दुरावस्था होणे साहजिकच आहे. दिवाळीनंतर साफसफाईसाठी थोडा वेळ काढून आपल्या किचनची साफसफाई व्यवस्थित करा. उत्सवात वापरलेली भांडी धुवून त्यांना पुन्हा आपापल्या जागी ठेवा आणि किचनला पुन्हा नवे रूप द्या.
३. कपाटाची साफसफाई
दिवाळीनिमित्त आपण नवे कपडे परिधान करतो. सोबतच एसेसरीज आणि वेगळ्या पद्धतीचे मेकअपदेखील करतो. असे केल्याने आपल्या कपाटात अस्ताव्यस्तता दिसू लागते. दिवाळीनंतर सफाईचे काम कपाटापासून सुरू करा. उत्सवात वापरण्यात येणारे कपडे आणि दागिने पुन्हा कपाटात व्यवस्थित ठेवा.
४. धूळ-धूराची सफाई
दिवाळीनंतर सर्वात जास्त समस्या धूळ आणि मातीची असते. फटाक्यांपासून निघणारी धूळ आणि धूर घरातील फर्निचर आणि अन्य वस्तूंवर जमा होते. धूळ साफ करण्यासाठी आपण व्हॅक्यूम क्लिनर किंवा कपड्यांचा वापर करु शकतो. फर्निचरसोबतच टेबल, पंखे आणि अन्य वस्तूंनादेखील चांगले साफ करा.
५. यांना बदला
दिवाळीनंतर घराला सुंदर दिसण्यासाठी आपण बेडशीट, बेडकव्हर, पडदे आणि सोफा कव्हर बदला. यामुळे आपले घर पुन्हा नव्याने आकर्षक दिसायला लागेल.
६. ओल्या कपड्यांनी सफाई करा
वर सांगितल्याप्रमाणे सर्वकाही केल्यानंतर ओल्या कपड्याने घरातील सर्व वस्तूंना चांगल्यापद्धतीने पुसा. यासाठी आपण क्लिंजरचाही वापर करु शकता.