​आॅफिसमध्ये काम करताना कंटाळा येतो?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2016 02:28 PM2016-08-13T14:28:29+5:302016-08-13T19:58:29+5:30

कर्मचाऱ्यांसाठी सर्वोत्तम आॅफिस म्हणून मायक्रोसॉफ्टचे आॅफिस आढळून आले आहे.

Does the person get bored while working in the office? | ​आॅफिसमध्ये काम करताना कंटाळा येतो?

​आॅफिसमध्ये काम करताना कंटाळा येतो?

googlenewsNext
मवार आला की, शाळेत जाण्यास विद्यार्थी जसे टाळाटाळ करतात, तसाच कंटाळा आॅफिस जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना असतो. म्हणजे अर्धवट मनानाचे कित्येक लोक आॅफिसला जात असतात. यामुळे त्यांच्या कामावर परिणाम दिसूनच येतो सोबत मानसिक आरोग्यही उत्तम राहत नाही. पण ‘मायक्रोसॉफ्ट’ कंपनीचे आॅफिस याला अपवाद आहे. 

कर्मचाऱ्यांसाठी सर्वोत्तम आॅफिस म्हणून मायक्रोसॉफ्टचे आॅफिस आढळून आले आहे. कंम्युटर इंडस्ट्रीमधील आघाडीची कंपनी मायक्रोसॉफ्टचे कर्मचारी हे अ‍ॅपलच्या कर्मचाऱ्यांपेक्षा अधिक नाविण्यपूर्ण काम करतात. तसेच  कोणत्याही टेक्नो कंपन्यात काम करणाऱ्या इतर कर्मचाऱ्यांपेक्षा फेसबुकचे कर्मचारी खूपच कमी कार्यशील असतात, असे भारतीय उद्योजकाने केलेल्या संशोधनात दिसून आले आहे. म्हणजे प्रोडक्टिव्हिटीच्या बाबतील फेसबुकचे कर्मचारी मागे पडले आहेत. 

मायक्रोसॉफ्टमध्ये कर्मचाऱ्या अधिक क्रिएटिव्ह काम करण्यास खूप वाव देण्यात येतो. नवकल्पनांना येथे सहज स्वीकारले जाते. ‘अ‍ॅपल’पेक्षा मायक्रोसॉफ्टचे कर्मचारी अधिक अ‍ॅडव्हेंचरस व खुश असतात.  त्याशिवाय गुगल आणि फेसबुकच्या कर्मचाऱ्यांपेक्षा अधिक काम करतात. 

फेसबुकमधील कर्मचाऱ्यांना अधिक क्रियाशील पद्धतीने काम करीत असल्याची प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. फेसबुकचे कर्मचारी हे नाविण्यपूर्ण काम करतात, मात्र सध्याच्या त्यांच्या स्थानानुसार त्यांना वैयक्तिक नाविण्यपूर्ण कामावर भर द्यावा लागणार असल्याचे गुड अँड कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संस्थापक समर बिरवाडकर यांनी सांगितले.

Web Title: Does the person get bored while working in the office?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.