​फेसबुुकवर अनोळखी व्यक्ती त्रास देतोय ?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2016 05:32 PM2016-11-05T17:32:42+5:302016-11-05T17:32:42+5:30

फेसबुक कुणाला माहिती नाही असे म्हणणे चुकीचे ठरणार. कारण प्रत्येकालाच फेसबुकचे जणू वेडच लागले आहे. आपल्याजवळही फेसबुक असावे आणि त्यातील फ्रेंडलिस्ट इतरांपेक्षा मोठी असावी असे सर्वांनाच वाटते.

Does the stranger have trouble on facebook? | ​फेसबुुकवर अनोळखी व्यक्ती त्रास देतोय ?

​फेसबुुकवर अनोळखी व्यक्ती त्रास देतोय ?

Next
सबुक कुणाला माहिती नाही असे म्हणणे चुकीचे ठरणार. कारण प्रत्येकालाच फेसबुकचे जणू वेडच लागले आहे. आपल्याजवळही फेसबुक असावे आणि त्यातील फ्रेंडलिस्ट इतरांपेक्षा मोठी असावी असे सर्वांनाच वाटते. मग त्यासाठी ज्यांना आपण ओळखतही नाही त्यांनाही सहजच फ्रेंडलिस्टमध्ये अ‍ॅड करतो. मात्र बºयाचदा असे लोक आपल्या टाईमलाईनवर नको त्या पोस्ट टाकतात आणि त्यामुळे लाजिरवाणा प्रसंग ओढवू शकतो. यासाठी फेसबुकवर त्रास देणाºया किंवा नको असलेल्या व्यक्तींपासून असे राहा दूर...

अनोळखी व्यक्तींची फ्रेंड रिक्वेस्ट कशी टाळाल
जर आपल्याला कोणाची फ्रेंड रिक्वेस्ट मान्य करायची नाही पण तरीही ती व्यक्ती सतत फ्रेंड रिक्वेस्ट पाठवत असेल तर आपल्या पेजवर होम आॅप्शनमध्ये पाठविण्यात आलेली रिक्वेस्ट इग्नोर करण्याचा आॅप्शन दिलेला असतो. यात रिक्वेस्ट पाठविणाºया व्यक्तिला तुम्ही त्याला डिलीट केले आहे याची माहितीपण मिळणार नाही. 

शेअर करणे मर्यादित ठेवा
जर तुम्हाला वाटत असेल काही ठराविक लोकांनीच तुमची पोस्ट पाहावी तर याच आॅप्शनमध्ये कस्टम सेटींगमध्ये जाऊन, ज्या व्यक्तीने तुमची पोस्ट पाहू नये असे वाटत असेल त्याचे नाव टाईप करा. तिला तुमची पोस्ट दिसणार नाही. 

कॅटेगिरी ठरवा
तुम्ही तुमच्या फ्रेंडलिस्टमध्ये मित्रांची कॅटेगिरी निवडू शकतात. पहिल्यात क्लोज फ्रेंड म्हणजे जवळचे मित्र, एक्वेंटेंसेज म्हणजे फक्त ओळख आणि रिस्ट्रीक्टेड म्हणजे अशा व्यक्तिंना या कॅटेगरीत येण्यास रोखू शकतात.

क्लोज फ्रेंड नोटीफिकेशनपासून दूर
जर तुम्हाला सतत क्लोज फ्रेंडकडून नोटीफिकेशन येत असतील तर फ्रेंडलिस्टमध्ये जाऊन मॅनेज आॅप्शनमध्ये योग्य पर्याय निवडावा लागेल.

Web Title: Does the stranger have trouble on facebook?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.