​कुत्र्यांना नाही आवडत तुमचे अतिप्रेम!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2016 02:27 PM2016-04-27T14:27:48+5:302016-04-27T19:57:48+5:30

माणसांनी मिठी मारणे कुत्र्यांना आवडत नाही.

Dogs do not like you over love! | ​कुत्र्यांना नाही आवडत तुमचे अतिप्रेम!

​कुत्र्यांना नाही आवडत तुमचे अतिप्रेम!

Next
ळीव प्राण्यांमध्ये सर्वाधिक लाडका प्राणी म्हणजे कुत्रा. सर्वात प्रामाणिक आणि प्रेमाची जाणीव ठेवणारा म्हणून कुत्रा ओळखला जातो. अनेक जण पाळीव कुत्र्याला कुटुंबातील एका सदस्याप्रमाणेच वागवतात. सोशल मीडियावर तर क्युट पपीसोबत काढलेले फोटोच सर्वात जास्त शेअर आणि लाईक केले जातात.

मात्र, यापुढे जरा कुत्र्याला मिठी मारून फोटो काढण्यापूर्वी दहा वेळा विचार करा. कारण माणसांनी मिठी मारणे कुत्र्यांना आवडत नाही. नुसते आवडत नाही तर त्यामुळे ते निराशदेखील होतात. सायकोलॉजी टुडेमध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनपर लेखात वरील निष्कर्ष नमुद करण्यात आलेले आहेत.

संशोधकांनी कुत्र्यांना माणसांनी अशा प्रकारे मिठी मारेलेल्या फोटोंचे अध्ययन केले असता लक्षात आले की, 82 टक्के फोटोंमध्ये कुत्र्यांच्या चेहºयावर चिंतेचे भाव दिसून आले. कान उतरलेले, चेहरा वळवलेला, पांढरे डोळे ही कुत्र्यांमध्ये चिंता, नाखुषपणा दर्शविण्याची चिन्हे आहेत.

तर मग तुमचा लाडका पपी कितीही मऊ, पे्रमळ, लुसलुशीत असू द्या, त्याला मिठी मारून नाराज नका करू. कोणाला कुत्र्यांना नाराज पाहणे आवडेल?

Web Title: Dogs do not like you over love!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.