'या' डिझायनर जोडीने तयार केला होता अंबानींच्या सुनेचा नववधू साज!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2019 16:56 IST2019-03-11T16:56:13+5:302019-03-11T16:56:42+5:30
सध्या फक्त देशातच नाही तर संपूर्ण जगभरामध्ये अंबानी घराण्याती शाही विवाहसोहळ म्हणजेच, आकाश अंबानी आणि श्लोका मेहताच्या लग्नाच्या चर्चा आहेत. या विवाहसोहळ्यात जगभरातील अनेक मोठ-मोठ्या उद्योगपतींसोबतच बॉलिवूडकरांनीही हजेरी लावली होती.

'या' डिझायनर जोडीने तयार केला होता अंबानींच्या सुनेचा नववधू साज!
सध्या फक्त देशातच नाही तर संपूर्ण जगभरामध्ये अंबानी घराण्याती शाही विवाहसोहळ म्हणजेच, आकाश अंबानी आणि श्लोका मेहताच्या लग्नाच्या चर्चा आहेत. या विवाहसोहळ्यात जगभरातील अनेक मोठ-मोठ्या उद्योगपतींसोबतच बॉलिवूडकरांनीही हजेरी लावली होती. मोठ्या थाटामाटात पार पडलेल्या या विवाहसोहळ्यात सर्व काही एकदम परफेक्ट होतं. अशातच सध्या इंटनेटवर व्हायरल होणाऱ्या फोटोमधून अंबानीचा शाही थाट पाहायला मिळत आहेच. पण तुम्हाला माहीत आहे का? अंबानींच्या सुनेने म्हणजेच श्लोका मेहताने जो ब्राइडल लेहेंगा परिधान केला होता, तो कोणी डिझाइन केला होता?
श्लोका मेहता जी आता अंबानी घराण्याची सून झाली आहे. तिच्या लग्नाचा रेड कलरचा ब्राइडल लेहेंगा प्रसिद्ध फॅशन डिझायनर जोडी अबू जानी आणि संदीप खोसला यांनी तयार केला होता. याबाबत स्वतः या डिझायनर जोडीने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करून सांगितले आहे. फक्त श्लोकाच नाही तर स्वतः नीता अंबानींचा रेड कलरचा लेहेंगा आणि ईशा अंबानीचा बेबी पिंक कलरचा लेहेंगाही अबू जानी आणि संदिप खोसला यांनीच डिझाइन केले आहेत.
श्लोकाच्या ब्राइडल लूकबाबत सांगायचे तर अबू जानी आणि संदीप खोसला यांनी ट्रेडिशनल रेड आणि गोल्डन कलरचा लेहेंगा तयार केला होता. ज्यावर रेड कलरने अत्यंत सुंदर आणि बारीक हॅन्ड-एम्ब्रॉयडरी केली होती. त्याचबरोबर रेड कलरचा नेटचा दुपट्टा ज्यावर गोल्डन कलरने बारिक नक्षीकाम केलं होतं. ज्वेलरीबाबत सांगायचे तर श्लोकाने ग्रीन कलरचा कुंदन चोकर नेकलेस परिधान केला होता आणि त्याचबरोबर मॅचिंग ईयररिंग्स, 3 लेयर्सचा लांब राणी हार, सुंदर माथा पट्टी, मोठी नथ आणि हातात लाल रंगाचा चूडाही परिधान केला होता.
नीता अंबानींच्या लेंहेग्याबाबत बोलायचे झाले तर त्यांनी गोल्डन कलरचा फुल वर्क असणारा हेवी लेहेंगा परिधान केला होता. या लेहेंग्याचा दुपट्टा रेड कलरचा होता. त्यासोबत कुंदन वर्क असलेला ग्रीन कलरचा हार, मॅचिंग इयररिंग्स, मांगटिका आणि नथ वेअर केली होती. यामध्ये नीता अंबानी फार सुंदर दिसत होती.
भावाच्या लग्नामध्ये ईशा अंबानीदेखील फार सुंदर दिसत होती. ईशाने बेबी पिंक आणि गोल्डन कलरचा लेहेंगा परिधान केला होता. त्यासोबत तिने मॅचिंग चोकर नेकलेस, राणी हार, मॅचिंग ईयररिंग्स आणि मांगटीका वेअर केला होता.