समाजकार्यासाठी इव्हा लाँगोरिया भारतात
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2016 01:09 AM2016-01-16T01:09:34+5:302016-02-05T05:32:23+5:30
हॉलिवूड सेलिबेट्रींचा सध्या भारतामध्ये वावर वाढला आहे. महत्त्वाचे म्हणजे, हे कलाकार केवळ पर्यटणासाठ...
Next
ह लिवूड सेलिबेट्रींचा सध्या भारतामध्ये वावर वाढला आहे. महत्त्वाचे म्हणजे, हे कलाकार केवळ पर्यटणासाठी नाही तर समाजकार्यासाठी भारतात येत आहेत. गेल्या महिन्यात पर्यावरणासंबंधात एक डॉक्युमेंटरी शूट करण्यासाठी लिओनार्दा डिकॅप्रियो भारतात आला होता. आता 'डेस्परेट हाऊसव्हाईज्' स्टार इव्हा लाँगोरिया एका एनजीओसाठी भारतात आली आहे. ती एकटी आली नसून सोबत तिचा होणारा पती जोज अँटोनिओ बेस्टन देखील आहे. दुबईमध्ये थाटामाटात एन्गेजमेंट उरकल्यावर इव्हा 'हार्मनी हाऊस' या लहान मुलांसाठी काम करणार्या संस्थेला भेट देण्यासाठी आली आहे. गरीब, अनाथ आणि बालपण हरवलेल्या मुलांना आसरा देण्याचे काम हार्मनी हाऊस ही संस्था करते. तिने ट्विट केले की, 'हार्मन हाऊसचे मी आभार मानते की त्यांनी आम्हाला भेट देण्याची संधी दिली. तुमचे कार्य खरंच खूप मोठे आहे.' मुलांसोबत इव्हाने मजेशीर वेळ घालवला. त्यांच्यासोबत फोटो काढून तिने तो इंटरनेटवर शेअरसुद्धा केला. तिचे स्वागत पारंपरिक पद्धतीने हार आणि गंध लावून करण्यात आले. त्यावर तिने 'इतक्या प्रेमाने स्वागत करण्याबद्दल थँक यू' म्हटले आहे.