प्रत्येक अविवाहित पुरुषाला माहित असावेत लग्नाबाबतचे ‘हे’ पाच सत्य !

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2017 09:57 AM2017-03-31T09:57:16+5:302017-03-31T15:37:20+5:30

आपल्याही लग्नाची तयारी सुरु आहे का? मग जाणून घ्या लग्नाबाबतचे सत्य

Every unmarried man should know that this is the 5th truth about marriage. | प्रत्येक अविवाहित पुरुषाला माहित असावेत लग्नाबाबतचे ‘हे’ पाच सत्य !

प्रत्येक अविवाहित पुरुषाला माहित असावेत लग्नाबाबतचे ‘हे’ पाच सत्य !

Next
ong>-Ravindra More
जेव्हा आपल्या लग्नाचे वय होते, तेव्हा आपल्या परिवाराचे सदस्य आपले लग्न करण्यासाठी आग्रह करतात, शिवाय कनव्हेंस करण्यासाठी आपल्याला चांगल्या चांगल्या गोष्टीही सांगितल्या जातात. मात्र लग्नाबाबत काही गोष्टी असतात, ज्यांची सत्यता आपणास लग्नाअगोदर माहित असणे अवश्य असते. आज आम्ही आपणास वैवाहिक आयुष्याशी संबंधीत अशाच पाच सत्य गोष्टींबाबत सांगत आहोत, ज्या प्रत्येक अविवाहित व्यक्तिला लग्नाअगोदर माहित असणे गरजेचे आहे. 

१. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चांगल्या कपल्समध्ये कधीही भांडण होत नाही, मात्र थोडेफार ठिक आहे. पण या भांडणाचा परिणाम आपल्या वैवाहिक आयुष्यावर होऊ द्यायचा नाही. 

२. लग्न झालेले जोडपे कधीच आपले भांडण पूर्ण मिटल्याशिवाय झोपत नाही. मग भलेही त्यांना ते भांडण मिटवायला पूर्ण रात्र लागली तरी चालेल.

३. लग्नानंतर आपल्या पार्टनरच्या परिवारावरही तेवढेच प्रेम करायचे आहे आणि आदर द्यायचा आहे, जेवढा की आपण आपण आपल्या परिवाराला देतो. 

४. मुले पती-पत्नीच्या नात्यात एका संजीवनीचे काम करतो. त्यांच्यामुळे दोघांच्या नात्यातील प्रत्येक समस्या दूर होते.

५. आपल्या पार्टनरला तिचे मित्र आणि परिवारासोबतही वेळ व्यतित करायला संधी द्या, त्यांचेही अस्तित्त्व आहे याचे भान ठेवा. 

Web Title: Every unmarried man should know that this is the 5th truth about marriage.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.