होणाºया पत्नीकडून पुरुषांच्या अपेक्षा ...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2016 04:38 AM2016-03-26T04:38:58+5:302016-03-25T21:38:58+5:30

केवळ मुलींनाच आपल्या होणाºया पतीकडून अपेक्षा राहतात.

Expecting a man from a married wife ... | होणाºया पत्नीकडून पुरुषांच्या अपेक्षा ...

होणाºया पत्नीकडून पुरुषांच्या अपेक्षा ...

googlenewsNext
 
से नव्हे तर प्रत्येक पतीही आपल्या होणाºया पत्नीमध्ये काही गोष्टी शोधतो. तिला आपल्या कुटुंबात घ्यावयाचे आहे. त्याकरिता आपली पत्नी कसा असावी. तिच्या आवडी,निवडी या सर्व गोष्टीचा तो बारकाईने विचार करतो. पुरुषांना होणाºया पत्नीकडून काय- काय अपेक्षा असतात त्याची ही माहिती.
समजदार : पतीला समजून घेणे हे खूप महत्वाचे आहे.  पतीला कोणत्या गोष्टीचा राग येतो व कोणत्या गोष्टीचा आनंद होतो अशा छोट्या गोष्टीही समजून घेणे हे खूप आवश्यक आहे. त्यामुळेच मुले समजदार मुलींची निवड करतात.
वाद न घालणारी : पती -पत्नीचे भांडण झाले तरी ते चार भिंतीच्या आतमध्ये राहीले पाहीजे. ते जर शेजारी व नातेवाईकांपर्यंत गेले तर पती आपल्या पत्नीवर नाराज होतो.
खोटे न बोलणारी : खरे बोलण्याची सवय ही माणसाला खूप गरजेची आहे. आपली पत्नी जर काही गोष्टी पतीपासून लपवून ठेवत असेल तर ते कोणत्याच पुरुषाला आवडत नाही. त्याकरिता महिलांनी खोटे बोलणे टाळावे.
विचारपूस करणारी : ज्यावेळेला कामावरुन पती घरी येतो. तेव्हा पत्नीने आपल्या हाताने बनविलेले जेवण त्याला द्यावे. तसेच त्याच्या कामाबद्दल काय सुरु आहे. दिवसभर काय झाले याची विचारपूस करावी.
स्वयंपाक यावा : आजची मॉडर्न मुली किचमनमध्ये जादा वेळ देणे पसंत करीत नाहीत.स्वयंपाक म्हणजे  वेळ व्यर्थ घालविणे असेही काहीजणी विचार करतात. परंतु, पुरुषांना घरी पत्नीने बनविलेला स्वयंपाकच मोठ्या प्रमाणात आवडतो. त्यामुळेच पुरुष ज्या मुली स्वयंपाक बनविण्यात एक्सपर्ट आहेत. अशाच मुली ते शोधतात.
 गप्पा करणारी : आपला पती दिवसभ कामानिमित्त बाहेर राहत असेल . तर दिवसातून दोन ते तीन वेळा पतीची विचारपूस करावी. फोनवर बोलत असतांना रोमांटिक गप्पाही माराव्यात.
एकट्याला वेळ देणारी : महिलांना काही वेळेला ज्याप्रमाणे निवांत वेळ हवा असतो. तसाच अगदी पुरुषांना  वेळ द्यावा. पती जर एकटा फिरत असाल तर फिरु द्यावे. काही बायका पतीवर अशाप्रकारामुळे संशयही घेतात. परंतु, ध्येयसह अन्य गोष्टीवर विचार करण्यासाठी असा निवांत वेळ देणे गरजेचे आहे.
प्रत्येक गोष्टीत लक्ष देणारी : पुरुष हा  प्रत्येक गोष्ट समजून उमजून घेत असतो. त्यामुळेच मुलेही आपली होणारी पत्नी ही प्रत्येक गोष्ट समजून घेणारी असावी. असा विचार करतात व तशा मुलींना पसंती देतात.
शांत स्वभाव : शांत राहणे हे खूप फायदेशीर असून, तसा स्वभाव हा सहसा प्रत्येकाला आवडतो. पत्नी जर छोट्या मोठ्या गोष्टीवरुन वाद करीत असेल तर ते पतीला अजिबात आवडत नाही. त्यामुळेच मुले शांत स्वभावाच्या मुलीची निवड करतात.

 

Web Title: Expecting a man from a married wife ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.