चेहरा उन्हानं काळवंडलाय? कडूनिंबाची पेस्ट लावा!
By Admin | Published: May 18, 2017 05:29 PM2017-05-18T17:29:21+5:302017-05-18T17:29:21+5:30
कडूनिंब, टमाटा आणि पपई लावा, सनटॅन गायब!!
-ज्योती सरदेसाई
उन्हाचा त्रास वाढतो आहेच. त्यात सनटॅन होतं, म्हणजे उन्हानं चेहरा, मान, हाताचे कोपर हे सारं काळं होतं. चेहऱ्याचं तेज गायब होतं. आण कितीही फेशियल करा, त्यानं तो तजेला येत नाहीच. चेहऱ्याला केमिकल तरी किती लावणार? त्यापेक्षा आपल्या घरात किचनमध्ये जा, आणि घरच्या घरी चेहरा तजेलदार तर कराच, पण रंगही उजळतो आणि साईड इफेक्टची शक्यता शून्य.
त्यासाठी करायचे हे काही साधे उपाय.
१) कडूनिंबाच्या पानांची पेस्ट
टमाटा, खसखस आणि एक चमता निरसं दूध घ्या. खसखस कोरडी वाटून घ्या. त्यात टमाटा घालून वाटून एकजीव करा. त्यात निरसं दूध घाला. हा लेप चेहऱ्याला, मानेला लावा, काळेडाग निघून जातात. त्वचेचा टोन एकसारखा होतो.