​फेसबुकवर लवकरच ग्रुप व्हिडिओ चॅट फीचर येणार !

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2016 06:13 PM2016-12-21T18:13:30+5:302016-12-21T18:13:30+5:30

फेसबुक युजर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे, ती म्हणजे लवकरच फेसबुक मॅसेंजरवर ग्रुप व्हिडिओ चॅट फिचर येणार आहे. यामुळे आपण जर कुटुंबासोबत नसाल तर या फिचरमुळे आपल्या लोकांशी थेट व्हिडिओद्वारे संपर्क साधू शकाल.

Facebook will soon have a group video chat feature! | ​फेसबुकवर लवकरच ग्रुप व्हिडिओ चॅट फीचर येणार !

​फेसबुकवर लवकरच ग्रुप व्हिडिओ चॅट फीचर येणार !

Next
सबुक युजर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे, ती म्हणजे लवकरच फेसबुक मॅसेंजरवर ग्रुप व्हिडिओ चॅट फिचर येणार आहे. यामुळे आपण जर कुटुंबासोबत नसाल तर या फिचरमुळे आपल्या लोकांशी थेट व्हिडिओद्वारे संपर्क साधू शकाल. येत्या काही काळात फेसबुकद्वारे अँड्रॉइड, आयओएस डेस्कटॉप ग्राहकांसाठी जगभरात ही सुविधा उपलब्ध होणार आहे.
या व्हिडिओ  चॅटमध्ये एकावेळी ६ जण बोलू शकतात व ५० लोक एकाच वेळी ऐकून, बोलून किंवा फक्त कॅमेरासमोर उपस्थित राहून सहभागी होऊ शकतात. सहापेक्षा अधिक लोक कॉलवर असतील तर फक्त डॉमिनंट स्पीकर सर्व सहभागींना दिसतील.
‘दर महिन्याला २४५ दशलक्ष लोकांनी मॅसेंजरद्वारे व्हिडिओ  कॉल सुविधा अनुभवल्यानंतर आता आम्ही जगभरातील मॅसेंजर ग्राहकांना ग्रुप चॅटद्वारे फेस-टू-फेस संवाद साधण्याची सुविधा घेऊन आलोय." असे फेसबुकने आपल्या ब्लॉगवरील पोस्टमध्ये म्हटले आहे. 
यासाठी तुमच्याजवळ मॅसेंजरचे लेटेस्ट फीचर असणे आवश्यक आहे. ग्रुप व्हिडिओ  चॅट सुरू करण्यासाठी तुम्हाला फक्त एक्झिस्टिंग ग्रुप कन्वर्सेशनवर जावे लागेल किंवा नवीन कन्वर्सेशन सुरू करुन स्क्रीनवर उजव्या बाजूला असलेल्या व्हिडिओ आयकॉनवर टॅप करावे लागेल

Web Title: Facebook will soon have a group video chat feature!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.