फेसबुक करणार ‘पेपर’ बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2016 03:08 PM2016-07-01T15:08:33+5:302016-07-01T20:38:33+5:30
अॅप यूजर्सना पाठवलेल्या मेसेजमध्ये कंपनीने म्हटले आहे की, येत्या २९ जुलैपासून ‘पेपर’ अॅपची सुविधा खंडित केली जाणार आहे.
अॅप यूजर्सना पाठवलेल्या मेसेजमध्ये कंपनीने म्हटले आहे की, येत्या २९ जुलैपासून ‘पेपर’ अॅपची सुविधा खंडित केली जाणार आहे.
एका रिसर्च फर्मने दिलेल्या माहितीनुसार, या अॅपला मिळणाऱ्या तुटपुंजा प्रतिसादामुळे कंपनीने हा निर्णय घेतला आहे. डिसेंबर २०१४ पासून ‘टॉप १५०० मोस्ट डाऊनलोडेड’ अॅपमध्ये ‘पेपर’चा सामावेश नाही.
गेल्या वर्षी मार्च महिन्यात अॅपचे शेवटचे अपडेट केले गेलेले आहे. केवळ आयफोन युजर्ससाठी असणारे हे अॅप अँड्रॉईड प्लॅटफॉर्मवध कधी आलेच नाही.
लोकांना वाचनाचा सर्वोत्तम अनुभव देण्याच्या हेतूने ‘पेपर’ डिझाईन करण्यात आले होते. जानेवारी २०१४ मध्ये लाँच करण्यात आल्यावर कंपनीमध्ये नव्या प्रकारच्या डिझाईन युगाची सुरुवात असे त्याचे वर्णन करण्यात आले.
परंतु मिळत असलेला थंड प्रतिसाद पाहून कंपनीने आता ‘इन्स्टंट आर्टिकल्स’वर अधिक लक्ष केंद्रित करण्याचे ठरविले आहे.
प्रोडक्ट मॅनेजर जॉश रॉबर्ट्स यांनी सांगितले की, ‘इन्स्टंट आर्टिकल्स’च्या माध्यमातून आम्ही शेकडो प्रकाशकांसोबत मिळून आमच्या यूजर्सना सर्वोत्तम कंटेट अगदी जलद आणि अभिनव पद्धतीने देत आहोत.