​FASHION : पिवळ्या रंगाचे ड्रेस देई आत्मविश्वास !

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2017 03:02 PM2017-03-23T15:02:24+5:302017-03-23T20:32:24+5:30

ज्या स्त्रिया पिवळ्या रंगाचे कपडे जास्त प्रमाणात वापरतात त्या स्त्रियांमध्ये आत्मविश्वास अधिक असतो.

FASHION: Confident of wearing a yellow color! | ​FASHION : पिवळ्या रंगाचे ड्रेस देई आत्मविश्वास !

​FASHION : पिवळ्या रंगाचे ड्रेस देई आत्मविश्वास !

Next
गवेगळे रंग उत्साह आणि आनंदाचे प्रतिक मानले जातात. आयुष्यात रंगांना विशेष महत्त्व आहे. विशेष म्हणजे रंगांविषयी प्रत्येकाची आवडनिवड वेगवेगळी असते. प्रत्येकजणाचा एक आवडता रंग असतो. कुणाला गुलाबी रंग आवडतो तर कुणाला नारंगी. कपडे घेतानाही ते रंगालाच महत्त्व देताना दिसतात. आपल्या आवडत्या रंगाचे कपडे आपल्या प्रगतीला कारणीभूत ठरु शकतात, हे एका अभ्यासाद्वारे निष्पन्न झाले आहे. आवडता रंग आपल्याला ऊर्जा देऊन आत्मविश्वास वाढवतात.

त्यातील एक  पिवळा रंग होय. एका संशोधनानुसार पिवळ्या रंगात ऊर्जा वाढविण्याची क्षमता असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. शिवाय ज्या स्त्रिया पिवळ्या रंगाचे कपडे जास्त प्रमाणात वापरतात त्या स्त्रियांमध्ये आत्मविश्वास अधिक असतो. यासोबतच त्यांची विविध कार्य करण्याची क्षमतादेखील अधिक असते. 

पिवळ्या रंगाचे कपडे घातल्याने विचार करण्याची व समजून घेण्याची शक्ती वाढते. पिवळ्या रंगाचे खाद्यपदार्थ खाल्ल्यानेही शारीरिक आरोग्य चांगले राहते. पिवळ्या रंगाची फळे, भाज्या आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवून पोटाशी संबंधित रोग दूर करतात. म्हणून आंबा, पपई, संत्री यासारख्या पिवळ्या फळांचा आपल्या आहारात समावेश करायला हवा. 

पिवळे वस्त्र धारण करणारे लोक अधिक आकर्षक वाटतात. पिवळ्या रंगातून निघणारे तरंग आपला आत्मविश्वास वाढवतात. यामुळे आपण अधिक आकर्षक दिसतो.

Web Title: FASHION: Confident of wearing a yellow color!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.