Fashion : तरुणांनो, या गोष्टींमुळे मुली होतात आकर्षित !
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2017 10:58 AM2017-08-25T10:58:15+5:302017-08-25T16:29:02+5:30
आम्ही आपणास काही टिप्स देत असून त्याद्वारे आपला लूक नक्कीच आकर्षक वाटेल. चला जाणून घेऊया त्या टिप्सबाबत...!
Next
एखाद्या सेलिब्रिटीसारखा आपलाही लूक असावा असे आजच्या प्रत्येक तरुणाला वाटते. त्यांच्यासारखे कपडे परिधान करुन आपण स्टायलिश होण्याचा प्रयत्नही करतो. मात्र बऱ्याचदा आपली कपड्यांची आवड-निवड चुकते आणि अपेक्षित लूक पासून वंचित राहतो. आज आम्ही आपणास काही टिप्स देत असून त्याद्वारे आपला लूक नक्कीच आकर्षक वाटेल. चला जाणून घेऊया त्या टिप्सबाबत...!
* लाइट ब्लू जीन्स आणि व्हाइट लिनन शर्ट यांच्या कॉम्बिनेशनने आपणले व्यक्तिमत्त्व खूपच फ्रेश आणि अट्रॅक्टिव्ह दिसते. आपण या ड्रेसमुळे चारचौघात नक्कीच वेगळे दिसता. त्यामुळे एखाद्या कार्यक्रमाला जाताना नक्कीच हे कॉम्बिनेशन ट्राय करा.
* बॉडी फिटिंग ब्लेजरमध्ये हात आणि शोल्डर मोठे दिसतात. हा लूक खूपच इंप्रेसिव्ह वाटतो. त्यामुळे ब्लेजर/जॅकेट परिधान करण्यास मागेपुढे विचार करु नये.
* विशेषत: गुलाबी रंग महिला वर्गास आवडता रंग आहे. त्यामुळे आकर्षक दिसण्यासाठी गुलाबी रंगाचा शर्ट ट्राय करु शकता. यामुळे आपले व्यक्तिमत्त्व नक्कीच वेगळे भासेल.
* बरेचजण स्किनी जीन्स परिधान करतात, मात्र बऱ्याचदा अशी जीन्स आपल्या व्यक्तिमत्त्वाला सुट करत नाही. त्यासाठी स्किनी नव्हे तर योग्य फिटिंगची जीन्सची निवड करावी. मात्र जास्त लूज जीन घालू नका.
* आपली बॉडी चांगली असेल तर व्ही नेक टी शर्ट आपल्याला खूपच आकर्षक वाटेल. बरेचजण व्ही नेक टी शर्टला बनियान समजतात, मात्र हा एक स्टायलिशचा भाग आहे. याने आपली वेगळी छाप पडण्यास मदत होते.
* चांगल्या फिटिंगचा सूटदेखील आपले व्यक्तिमत्त्व खूलवितो. लग्न समारंभात किंवा इतर कोणत्याही कार्यक्रमात नेव्ही ब्लू किंवा ब्लॅक कलरचा सूट परिधान केल्यास आपणाकडे सर्वांच्या नजरा टिकून राहतील हे मात्र नक्की.
* व्यक्तिमत्त्व अजून स्टायलिश बनवायचे असेल तर क्लासी किंवा स्पोर्टी वॉच हातात घालायला विसरु नका. यामुळे नक्कीच आपला लूक हटके दिसतो.
* ड्रेस कोड अगदी परफेक्ट असेल मात्र त्यानुसार शूज नसतील तर आपले व्यक्तिमत्त्व फिके पडते. त्यासाठी ब्रोग, डर्बी आणि बोट शूज यूज करायला हरकत नाही. यामुळे आपणास क्लासी आणि रिच लूक मिळतो.
* सर्व परफेक्ट झाल्यानंतर मात्र मंद-मंद परफ्युम यूज करायला विसरु नका. यामुळे आपल्या व्यक्तिमत्त्वाला मोहकता येण्यास मदत होते.
Also Read : OMG : मुलांना अजिबात आवडत नाहीत ‘या’ प्रकारच्या मुली !
: OMG : ‘या’ कारणाने दाढी वाढलेल्या मुलाकडे आकर्षित होतात मुली !