Fashion : ट्रेंडी लूकसाठी ‘टो-रिंग’ची वाढली क्रेझ !

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2017 09:57 AM2017-10-08T09:57:33+5:302017-10-08T15:27:33+5:30

जोडव्यांमध्ये सध्या टो-रिंग नावाचा प्रकार खूप ट्रेंडी होताना दिसत आहे. जर तुम्हालाही ट्रेंडी दिसणे आवडत असेल तर जोडव्यांच्या या ट्रेंडविषयी जाणून घ्या.

Fashion: Increase in 'to-rings' for trendy look! | Fashion : ट्रेंडी लूकसाठी ‘टो-रिंग’ची वाढली क्रेझ !

Fashion : ट्रेंडी लूकसाठी ‘टो-रिंग’ची वाढली क्रेझ !

googlenewsNext
रतीय परंपरेनुसार लग्नानंतर स्त्रिया पायात जोडवी घालतात. मात्र गेल्या दशकापासून बदलत्या मॉडर्न जीवनशैलीनुसार जोडवी घालण्याचे प्रमाण काही अंशी कमी झाले होते. कारण राहणीमान फॅशनेबल आणि पायातील जोडवी ही जून्या फॅशनचे, त्यामुळे बहुतेक महिला ते वापरणे टाळायचे.
मात्र फार कमी स्त्रियांना हे माहित असेल की या जोडव्यांमध्येही आता नवीन ट्रेंड आला आहे. फॅशन व ट्रेंडच्या या काळात प्रत्येक गोष्ट ट्रेंडी झाली आहे. मग जोडवींना पण डिझायनरांनी वेगळा आणि फॅशनेबल लुक देण्याचा प्रयत्न केला आहे. याच प्रयत्नातून जोडव्यांमध्ये सध्या टो-रिंग नावाचा प्रकार खूप ट्रेंडी होताना दिसत आहे. जर तुम्हालाही ट्रेंडी दिसणे आवडत असेल तर टो-रिंग म्हणजे जोडव्यांच्या या ट्रेंडविषयी जाणून घ्या. 
बहुतांश टीव्ही मालिकांमध्ये लग्नानंतर सासरी येणाऱ्या नववधूच्या पायांत या प्रकारची जोडवी दिसतात. आजकाल प्लास्टिकची नाजूक दिसणारी जोडवी फॅशनमध्ये आहेत. ही जोडवी विविध रंग व डिझाईनमध्ये उपलब्ध आहेत. यासोबतच रबर, मोती, स्टोनच्या जोडव्यांचे अनेक प्रकार बाजारात उपलब्ध आहेत.
स्टीलची जोडवी विशेष आकर्षक दिसतात. स्टर्लिंग सिल्व्हर टो-रिंगने तर आंतरराष्ट्रीय बाजारातही स्थान मिळवले आहे. प्लॅटिनमसारख्या व्हाईट मेटलची जोडवी फॉर्मल व कॅज्युअल अशा दोन्ही प्रसंगी घालता येतात.
मेटल व विना मेटल अशी दोन्ही प्रकारची जोडवी बाजारात उपलब्ध आहेत. बहुतांश जोडवी पायाच्या दुसऱ्या बोटात घातली जातात. परंतु बदलत्या फॅशनसोबत पायाच्या कुठल्याही बोटात तुम्ही ही घालू शकता.
ही जोडवी कोणत्याही ड्रेससोबत घालून मॉडर्न व ट्रेंडी लूक मिळवता येतो. फंकी व कूल प्रकारची जोडवी तुमच्या व्यक्तिमत्वाला अधिक खुलवतील. 

Web Title: Fashion: Increase in 'to-rings' for trendy look!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.