Fashion : चला, हिवाळ्यातही स्टायलिश दिसुया...!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2017 08:10 AM2017-11-23T08:10:40+5:302017-11-23T13:40:40+5:30
हिवाळ्यातीलही अशा काही फॅशन ट्रिक्स आहेत, ज्यांचा वापर करुन आपण जास्त पैसे खर्च न करता थंडीतूनही बचाव करु शकाल शिवाय स्टायलिशदेखील दिसाल. चला जाणून घेऊया त्या ट्रिक्सबाबत...
Next
ह वाळ्यात आपण स्वेटर, जॅकेट असे उबदार कपडे परिधान करतो, त्यामुळे आपणास असे वाटत असेल की, सर्व फॅशनच संपली आहे. मात्र असा विचार करणे चुकीचे ठरेल. हिवाळ्यातीलही अशा काही फॅशन ट्रिक्स आहेत, ज्यांचा वापर करुन आपण जास्त पैसे खर्च न करता थंडीतूनही बचाव करु शकाल शिवाय स्टायलिशदेखील दिसाल. चला जाणून घेऊया त्या ट्रिक्सबाबत...
हिवाळ्यामध्ये लग्नाला जाण्यासाठी तयार होण्यास खूप पर्याय असतात. प्रत्येक कार्यक्रमात सूट परिधान करुन जाण्याची गरज नाही. तसेच एकाच विवाह सोहळ्यात कितीतरी कार्यक्रम असतात. मग आता सूट नसेल तर कुर्ता हा पर्याय आहे. हिवाळ्यात लग्न सोहळ्यासाठी कुर्ता हा परफेक्ट आॅप्शन आहे. यामध्ये तुम्ही थंडीपासून रक्षण करुन स्टायलिशही दिसाल.
* नेहरू जॅकेट
हे स्लीव्हलेस जॅकेट फक्त कुत्यार्ला परफेक्ट लुक देतेच, शिवाय तुम्हाला फॉर्मल आणि क्लासी टचही देते. कुर्ता आणि जॅकेट परिधान करायचे असेल तर याची रंगसंगती सूट होणारी असावी. तसेच जॅकेटचे फक्त मधलेच बटन लावा आणि बाकीचे मोकळे सोडा.
* ब्लेझर
ब्लेझरमुळे हिवाळ्यात थंडीपासून रक्षण होण्याबरोबरच तुम्ही स्टायलिशही दिसाल. तुमच्या आउटफिटला ब्लेझर एक स्टायलिश लुक देतो. ब्लेझर तुम्हाला परफेक्ट येणारे असावे. तुमचा सिंपल आणि क्लासी लुक सगळ्यांचे लक्ष वेधून घेईल.
* शाल
कुर्त्याबरोबर शाल घेतल्यास तुम्हाला क्लासी लुक मिळेल. थंडीपासून रक्षण करण्याबरोबरच शाही लुकही मिळेल. मात्र शालीचा रंग खूप डार्क नसावा. लाईट रंग तुमच्या आउटफिटला सुट होणारा असावा.
* गरम फॅब्रिक्सवर करा खर्च
हिवाळ्यात गरम फॅब्रिक्सशी आपले नाते अधिकच घट्ट होते. थंडीपासून रक्षण करण्यासाठी सिल्क एक चांगला आॅप्शन आहे. तसेच तो आरामदायकही आहे.