Fashion : ​सध्या ‘या’ प्रकारच्या ब्लाऊजची आहे क्रेझ !

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2017 11:46 AM2017-06-07T11:46:08+5:302017-06-07T17:16:43+5:30

साडीचे सौंदर्य खुलविण्यासाठी आणि सर्वांचे लक्ष वेधण्यासाठी तुम्ही परिधान केलेले ब्लाऊज महत्त्वाची भूमिका बजावते.

Fashion: Now this kind of blouse is crazy! | Fashion : ​सध्या ‘या’ प्रकारच्या ब्लाऊजची आहे क्रेझ !

Fashion : ​सध्या ‘या’ प्रकारच्या ब्लाऊजची आहे क्रेझ !

Next
ुतांश महिला लग्नसोहळा किंवा विविध कार्यक्रमात जर साडी परिधान करीत असेल तर साडीसोबत लेहंगा, घागरा चोळी किंवा शरारा परिधान करण्यास अधिक प्राधान्य देते. विशेष म्हणजे साडीचे सौंदर्य खुलविण्यासाठी आणि सर्वांचे लक्ष वेधण्यासाठी तुम्ही परिधान केलेले ब्लाऊज महत्त्वाची भूमिका बजावते. 
सध्या डीप नेक, हेवी वर्क आणि बॅकलेस असे प्रकारचे ब्लाऊज लोकप्रिय झाले आहेत. यासाठी फ्रंट नॉट, हॉस्टर बॅक ओपन, चोळी, स्लिव्हलेस असे विविध प्रकाराचे ब्लाऊज तुम्ही वापरू शकता. ब्लाऊजचा गळा जसे त्याचे सौंदर्य खुलवतो तसेच ब्लाऊजचे हातसुद्धा आकर्षक असण्याकडे स्त्रियांचा आग्रह असतो. पूर्ण हाताचे, थ्री फोर्थ, स्लिवलेस किंवा फुग्याच्या हाताचे ब्लाऊज बाजारात पहायला मिळतात. पूर्ण हाताचे नेटचे ब्लाऊज, बंद नेटचा गळा याला जास्त पसंती आहे.
जाळीवर विणकाम केलेल्या ब्लाऊजचीही सध्या फॅशन आहे. शरारा, लेहंगा यावर हे ब्लाऊज परिधान करून राजस्थानी वेशभूषा करता येईल. साऊथ इंडियन मोठ्या काठपदराची साडी लोकप्रिय आहे. या साडीवर मोठ्या काठाचे कोपऱ्यापर्यंतचे हात शिवण्याची फॅशन पुन्हा आली आहे. यामुळे तुम्ही हा हटके लुक करू शकता.
आजकाल मिसमॅच पद्धतीचे कपडे परिधान केले जातात. साडीच्या रंगाच्या विरुद्ध रंगाचा ब्लाऊज शिवून अगदी साध्या साडीला उठावदार बनवता येते. छापील नक्षीचे भागलपुरी सिल्क ब्लाऊज बाजारात मोठ्या प्रमाणात आहेत. एकाच रंगाच्या साडीवर हे ब्लाऊज छान उठून दिसतात. चंदेरी किंवा सोनेरी रंगाचे ब्लाऊज कुठल्याही साडीवर शोभून दिसतात. स्लिवलेस, मेगा स्लीव्हज, नॉट्स, स्पगेटी, हॉल्टर नेक, प्रिन्सेस लाईन ब्लाऊज अशा वेगवेगळ्या प्रकारांमध्ये हे ब्लाऊज शिवून घेता येतात. 

Web Title: Fashion: Now this kind of blouse is crazy!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.