आॅफिसला जातानाही दिसा फॅशनेबल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2017 07:17 PM2017-09-06T19:17:24+5:302017-09-08T17:49:22+5:30

आॅफिस म्हणजे कामाची जागा. दिवसभरात कामानिमित्त अनेक लोकांना आपण भेटत असतो. कामानिमित्त बाहेर वावरत असतो. त्यामुळे आपला लूक कसाही ठेवून चालत नाही. यासाठी आॅफिस वेअर फॅशननं अनेक पर्याय तुमच्यासमोर ठेवले आहेत. त्यातला तुम्हाला कोणता आवडतो ते पाहा!

Fashion for office.. Why not? | आॅफिसला जातानाही दिसा फॅशनेबल!

आॅफिसला जातानाही दिसा फॅशनेबल!

ठळक मुद्दे* इनकॉर्पोरेटिंग प्रिंण्टस हा प्रिण्टसचा नवा प्रकार उपलब्ध आहे. भडक आणि मोठ्या आकारातल्या प्रिण्टसमुळे आॅफिसमध्ये व्यक्तिमत्त्व खुलून दिसतं.* पेस्टल रंगाचे टॉप्स, त्यावर काळ्या पांढ-या रंगाचं ब्लेझर, गडद रंगाची फ्लेअर्ड पॅण्ट, कमीत कमी दागिने ही फॅशन आॅफिससाठी अनेकजणी फॉलो करता आहेत.* गळ्यातल्या स्कार्फवजा स्कार्व्हसमुळेही आॅफिसमध्ये हटके लूक मिळू शकतो.

- माधुरी पेठकर


आॅफिसला काय घालून जावं? असा प्रश्न अनेकजणींना रोजच पडतो. आॅफिसला जाताना साधे सुधे जरा कमी फॅशनचे कपडे घालण्याकडेच अनेकींचा कल असतो. आॅफिस म्हणजे कॅज्युअल लुक इतकं हे समीकरण घट्ट झालं आहे. पण कधीकधी कंटाळा आणणारं हे समीकरण ब्रेक करता येतं. तशी सोय ‘आॅफिस वेअर फॅशन’नं दिली आहे.
आता ही कुठली नवी फॅशन? असा प्रश्न पडला असेल तर नेटवर जावून शोधा. शोधलं की फॅशनच्या जगात आॅफिस लूकसाठीही फॅशनचे कपड्यापासून त्यावर घालायच्या दागिन्यांपर्यंत असंख्य फॅशन उपलब्ध आहे. फॅशन म्हणजे चमकढमक, चंकीफंकी लूक नसून आपलं नैसर्गिक रूप उठावदार दिसेल यासाठी कपड्यांपासून मेकअपपर्यंत उपलब्ध असलेले पर्याय म्हणजेच फॅशन.
आॅफिस म्हणजे कामाची जागा. दिवसभरात कामानिमित्त अनेक लोकांना आपण भेटत असतो. कामानिमित्त बाहेर वावरत असतो. त्यामुळे आपला लूक कसाही ठेवून चालत नाही. आपल्याला आणि आपल्याला भेटणा-यालोकांना आपल्याकडे पाहून छान वाटावं यासाठी आपण काही प्रयत्न करायला हवेत. यासाठी आॅफिस वेअर फॅशननं अनेक पर्याय तुमच्यासमोर ठेवले आहेत. त्यातला तुम्हाला कोणता आवडतो ते पाहा!

 

1. आॅफिसमध्ये घालून जाण्यासाठी फुलांचे आकर्षक डिझाइन असलेले कपडे उठावदार रंगात बाजारात उपलब्ध आहे.
2. इनकॉर्पोरेटिंग प्रिण्टस हा प्रिण्टसचा नवा प्रकार उपलब्ध आहे. भडक आणि मोठ्या आकारातल्या प्रिण्टसमुळे आॅफिसमध्ये व्यक्तिमत्त्व खुलून दिसतं. शिवाय आॅफिसमध्ये अचानक एखादा कार्यक्रम निघाला किंवा छोटी मोठी मीटिंग असली तर या प्रिण्टसचे कपडे घालणं हा उत्तम पर्याय ठरतो.इनकॉर्पोरेटिंग प्रिण्टसचे टॉपस घातलेले असतील तर त्यावर ब्लेझर घालावं हेच कपडे घालून आॅफिसच्याच कामासाठी कुठे संध्याकाळी जायचं असेल तर ब्लेझर काढून गळ्यात एखादा नाजूकसा दागिना घालावा. आॅफिससाठी ही फॅशन उत्तम
3. पेस्टल रंगाचे टॉप्स, त्यावर काळ्या पांढ-या रंगाचं ब्लेझर, गडद रंगाची फ्लेअर्ड पॅण्ट, कमीत कमी दागिने ही फॅशन आॅफिससाठी अनेकजणी फॉलो करता आहेत. फारच घाई असली तर पांढ-या आणि काळ्या रंगाचं कॉम्बिनेशनही उठून दिसतं.

 

 

4. पूर्वी स्कर्ट हे आउटिंगसाठी किंवा कार्यक्रमासाठीच वापरले जायचे. पण आता आॅफिसला जाताना पायाच्या घोट्यापर्यंतचे पेन्सिल स्कर्टस, त्यावर शोभेल असा टॉप आणि त्यावर पॉलिश्ड् दागिनेही घालता येतात. शुक्रवार-शनिवार या दिवशी आॅफिसमध्ये काम असलं तरी सर्वजण येणा-या रविवारमुळे रिलॅक्सड मूडमध्ये असतात. तेव्हा शुक्रवार पाहून अशी फॅशन करायला काहीच हरकत नाही.

5. गळ्यातल्या स्कार्फवजा स्कार्व्हसमुळेही आॅफिसमध्ये हटके लूक मिळू शकतो. यासाठी कमी डार्क शेडचे कपडे आणि त्यावर जरा भडक रंगाचे स्कार्व्हस उठाव आणतात.
6. एखाद्या महत्त्वाच्या कॉर्पोरेट मीटिंगमध्ये जायचे असेल , तिथे आपलं व्यक्तिमत्त्व जरा रूबाबदार दिसायला हवं असं वाटत असेल तर केप्स आणि लॉंग जॅकेटस घालावेत.

 

 

Web Title: Fashion for office.. Why not?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.