आयफेल टॉवर होणार फॅशन शो
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2016 12:31 PM2016-08-21T12:31:14+5:302016-08-21T18:07:40+5:30
‘फ्रेंच युरोपियन इंडियन फॅशन वीक’ नावाचा हा शो २१ ते २३ आॅक्टोबर दरम्यान आयफेल टॉवरच्या पहिल्या मजल्यावर पार पडणार आहे.
Next
ज ातील सर्वात रोमॅण्टिक शहर पॅरिसमधील सर्वात रोमॅण्टिक जागा म्हणजे आयफेल टॉवर. जगभरातून लाखो पर्यटक हे आयकॉनिक टॉवर पाहण्यासाठी येतात. याच ऐतिहासिक आयफेल टॉवरवर प्रथमच फॅशन शो आयोजित केला जात आहे.
‘फ्रेंच युरोपियन इंडियन फॅशन वीक’ नावाचा हा शो २१ ते २३ आॅक्टोबर दरम्यान आयफेल टॉवरच्या पहिल्या मजल्यावर पार पडणार आहे. जगभरातील फॅशन डिझायनर्सना आपली संस्कृती त्यांच्या कलेच्या माध्यमातून एवढ्या भव्य व्यासपीठावर सादर करण्याची अनोखी संधी या शोद्वारे प्राप्त होणार. म्हणूनच अनेक नामवंत डिझायन या शोमध्ये आपले लेटेस्ट कलेक्शन सादर करतील अशी अपेक्षा आहे.
शो आयोजित करणाºया कंपनीचे अध्यक्ष सतीश रेड्डी म्हणाले की, जागतिक सात आश्चर्यांमध्ये सामावेश असणाऱ्या आयफेल टॉवरवर अशा स्वरुपाचा फॅशन शो करण्याची संधी मिळणे आमच्यसाठी खूप मानाची व आनंदाची गोष्ट आहे. भारत आणि फ्रान्समधील मैत्रीपूर्ण संबंधामुळे ते शक्य झाले.
जगात शांततेचा संदेश पोहचविण्यासाठी जगभरातील डिझायनर्सना एका छताखाली आणून एकात्मतेचा संदेश देण्याचा या शोचा हेतू आहे. त्याबरोबच भारत-फ्रान्समधील सांस्कृतिक दुवा म्हणून ही संस्था काम करू इच्छिते.