फॅशन स्लीव्हलेस आणि बॅकलेसची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2017 01:11 PM2017-04-12T13:11:55+5:302017-04-12T13:11:55+5:30
ॠतु कोणताही असो थोडं फॅशनेबल आणि स्मार्ट दिसायचं असेल तर पहिली पसंती स्लीव्हलेसलाच असते. आता तर स्लीव्हलेसबरोबर बॅकलेसचीही चलती आहे.
- मोहिनी घारपुरे - देशमुख
फॅशन स्लीव्हलेस आणि बॅकलेसची ॠतु कोणताही असो थोडं फॅशनेबल आणि स्मार्ट दिसायचं असेल तर पहिली पसंती स्लीव्हलेसलाच असते. आता तर स्लीव्हलेसबरोबर बॅकलेसचीही चलती आहे. उन्हाळ्याच्या दिवसात असंही उकाड्यानं जीव हैराण होत असतो. त्यामुळेच अनेक बायका स्लीव्हलेस ड्रेसेसला पसंती देतात. स्लीव्हलेस ड्रेसची फॅशन तशीच दरवर्षीच विशेषत: उन्हाळ्यात इन असते.एरवीही फॅशन म्हणून स्लीव्हलेसला वर्षभर भाव असतो.
स्लीव्हलेसच्या जोडीला आता बॅकलेस चोलीलाही स्त्रियांची आणि मुलींची विशेष पसंती असते. बॅकलेस पार्टीवेअर गाऊन देखील अनेकींच्या वॉर्डरोबमध्ये हमखास आढळून येतात. खरंतर स्लीव्हलेस कपडे म्हणजे काही वर्षांपूर्वी बोल्डनेसचाच सिंबॉल होते. पण आता त्याचा वापर सर्रास होत असल्यानं त्याविषयी कोणताही पूर्वग्रह उरलेला नाही. स्लीव्हलेस केवळ स्त्रियाच वापरतात असं नाही तर तर पुरूषही स्लीव्हलेस टीशर्ट मोठ्या हौशीनं वापरता आहेत.
प्लेन टीशर्ट असो वा थोडेसे प्रिंटेड, स्लीव्हलेस कपडे अनेक पुरूष विशेषकरून जीममध्ये जाताना किंवा व्यायाम अथवा खेळण्याच्या वेळात घालण्यास पसंती देतात. स्त्रियांकरिता तर स्लीव्हलेस कपड्यांमध्ये भरपूर व्हरायटी उपलब्ध आहेत. कोणतीही प्रिंट असो, कपड्याचं टेक्श्चर कसंही असो स्लीव्हलेसकरीला ते सूट होतंच. नेटच्या स्लीव्ह्ज - अनेक स्लीव्हलेस ड्रेसेसला नेटच्या स्लीव्ह्ज लावल्या तर त्यांना आणखीनच चांगला गेटअप येतो.
तसंच नेटच्या कपड्याऐवजी त्यापद्धतील पारदर्शक कापड वापरून स्लीव्ह्ज लावल्या तरीही ते अत्यंत सुंदर आणि आकर्षक दिसतं. बॅकलेस चोली वा पार्टीवेअर - एखाद्या पार्टीत जर एकदम आकर्षक दिसायचं असेल तर बॅकलेसचा पर्याय खासच आहे. अलिकडे त्याचीही फारच फॅशन आहे. बोल्ड फॅशन स्टेटमेंट म्हणून बॅकलेस गाऊन वा बॅकलेस चोलीला पसंती दिली जाते. हजबन्ड्स नॉट, त्याला अत्यंत आकर्षक असे लटकन आणि बॅकलेस गळा असलेली चोली यानं स्त्रियांचं सौदर्य अधिक खुलून न दिसेल तरच नवल